पुष्कर: राजस्थानमच्या पुष्करमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात हरियाणातील रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. 5 फूट 8 इंच उंच, 13 फूट लांब आणि 1500 किलो वजनी रेड्याची किंमत तब्बल 23 कोटी रुपये आहे. या मेळाव्यात आलेल्या लहान मुलं, वृद्ध आणि परदेशी पर्यटकांमध्ये हा रेडा चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण या रेड्यासोबत फोटो आणि सेल्फी घेत आहेत. विशेष म्हणजे, हा रेडा किमतीसोबतच आपल्या प्रजनन क्षमतेमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो.
फक्त वीर्यातून 5 लाखांची कमाई'अनमोल' नावाच्या रेड्याचे मालक परमिंदर गिल यांनी सांगितले की, हा 23 कोटी रुपयांचा रेडा खरेदी करण्याची अनेकांनी इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी या सर्व ऑफर नाकारल्या. याचे कारण म्हणजे, परमिंदर या रेड्याला आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, अनमोलच्या वीर्यातून परमिंदर दर महिन्याला सूमारे 5 लाख रुपयांची कमाई करतात. अनमोलच्या वीर्यामुळे शेकडो म्हशी गरोजर होतात, त्यामुळे याला खूप मागणी असते.
अनमोलच्या महिन्याचा खर्च लाखोंमध्येअनमोलच्या आलिशान आयुष्यासाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च करावा लागतो. परमिंदर गिल रेड्याच्या डाएटवर दिवसाला 1500 रुपये खर्च करतात. अनमोलच्या निरोगी आयुष्य आणि ताकदीसाठी डाएटमध्ये ड्राय फ्रट, हाय कॅलरीजचा समावेश करण्यात येतो. यामध्ये 250 ग्रॅम बदाम, 30 केळी, 4 किलो डाळिंब, 5 किलो दूध आणि 20 अंडी आहेत. याशिवाय केक, हिरवा चारा, तूप, सोयाबीन आणि मकाही भरवला जातो.