Rare Banknote: ऑनलाइन जुन्या चलनांची विक्री होते, याबाबत तुम्ही ऐकलं असेल. जुनी नाणी किंवा जुन्या नोटांना हजारोंची बोली लागते. पण, एका पॅलेस्टाईन नोटीची कोट्यवधी रुपयांमध्ये बोली लागल्याचा प्रकार समोर आला आहे. एक चॅरिटी दुकानात मिळालेल्या बँकनोटेची ऑनलाइन 1,40,000 पाउंड (सूमारे 1.3 रुपये) मध्ये विक्री झाली. या दुर्मिळ नोटेला त्याच्या मूल्यापेक्षा 1,400 पट जास्त किंमत मिळाली.
मिरर डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, पॉल वायमन नावाचा व्यक्ती ऑक्सफॅममध्ये स्वयंसेवा करत असताना दान केलेल्या वस्तूंच्या बॉक्समध्ये त्याला £100 पॅलेस्टाईन पाउंड आढलले. ही नोट मिळाल्यानंतर पॉलने एका लिलावगृहाशी संपर्क साधला. तिथे तज्ञांनी त्या नोटेचे मूल्य £30,000 इतके ठरवले.
एका नोटेची किंमत एक कोटींपेक्षा जास्तपण, नंतर ही नोट लंडनमध्ये स्पिंक ऑक्शन हाउसमध्ये गेली, तेव्हा तिला £1,40,000 बोली लागली. गेल्या महिन्यात 28 एप्रिल रोजी या नोटेची ऑनलाइन बोली लागली. याबाबत सांगताना पॉल वायम म्हणाले की, 'मी विचार केला नव्हता की, माझ्या हातात इतकी दुर्मिळ वस्तू आहे. या नोटेला इतकी मोठी बोली लागेल, याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.'
स्पेशल आहे बँकनोटमिळालेल्या माहितीनुसार, हे £100 पॅलेस्टाईन पाउंड स्पेशल आहे, कारण पृथ्वीवर अशाप्रकारच्या फक्त दहा नोटा अस्तित्वात आहेत. हे नोट 1927 मध्ये पॅलेस्टाईनमध्ये ब्रिटिशांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. जगभरातून अनेकांनी या नोटेसाठी बोली लावली होती. आता या नोटेची विक्रीतून मिळालेल्या पैशांचा समाजकार्यात वापर होणार आहे.