Man Found Treasure in Field : जगभरातून अनेक अशा घटना समोर येत असतात ज्यात कुणालातरी कुठेतरी अचानक खजिना सापडला आणि रातोरात त्यांच नशीब चमकलं. पूर्वी लोकांकडे दागिने आणि सोन्या-चांदीची नाणी असायची. ते चोरांपासून वाचवण्यासाठी लोक ते एकतर घरात किंवा शेतात गाडून ठेवत होते. अशाच एका व्यक्तीला त्याच्या शेतात खजिना सापडला आहे ज्याद्वारे तो कोट्याधीश बनला.
द सनच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीच्या शेतात खोदकाम चालू होतं. यादरम्यान त्याला कशाचातरी आवाज ऐकू आला. मजूर आणि शेताच्या मालकाने पाहिलं तर त्यांना जे दिसलं ते पाहून हैराण झाले. ते एखाद्या दुर्मिळ खजिन्यासारखं होतं. आधी व्यक्तीला वाटलं की ते सामान्य नाणी असतील. पण यांची किंमत इतकी जास्त होती की, एक्सपर्ट्सही हैराण झाले.
ही घटना इंग्लंडच्या इसेक्समधील आहे. इथे काही लोक शेतात मेटल डिटेक्टरिट्स घेऊन काहीतरी शोधत होते. या ठिकाणावर पोहोचल्यावर त्यांना मशीनवर काही सिग्नल मिळाले. तेव्हा त्यांनी तिथे खोदकाम सुरू केलं. अशात त्यांना खाली गाडून ठेवलेला खजिना सापडला. त्यांच्या हाती एकूण 122 चांदीची नाणी लागल्या. ही नाणी 950 वर्षआधी जुनी आहेत. चांदीची नाणी 4 इंच आत गाडली होती. एकूण 144 नाण्यांमध्ये अशीही काही नाणी सापडली ज्यांची किंमत फार जास्त आहे.
किंमत वाचून व्हाल अवाक्
लिलाव करणारा ब्रैडले हॉपर म्हणाला की, या नाण्यांच्या मालकाचा मृत्यू युद्धादरम्यान झाला असावा. ते कुणाला देता आले नाहीत. म्युझिअमकडून एकूण 13 नाणी खरेदी करण्यात आले आहेत. तर 122 नाणी वितळवल्या जातील. यातून मिळणारा फायदा शेत मालकाला दिला जाईल. या नाण्यांची किंमत 1 कोटी 88 लाख रूपये मिळण्याचा अंदाज आहे.