एखाद्या विमानाप्रमाणे दिसणारा तब्बल ८०० किलोंचा मासा पकडण्यात आला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण २० लाख रुपयांना या माश्याची विक्री झाली आहे. हा मासा खूप दुर्मिळ आहे. याआधी असा मासा दिसून आला नव्हता. हा विशाल मासा पश्चिम बंगालच्या दिघा या ठिकाणी आढळून आला आहे. पश्चिम बंगालच्या दिघामध्ये सापडलेल्या या माश्याच नाव चिलशंकर मासा आहे. इतका मोठा मासा गळाला लागल्यामुळे मासेमार प्रचंड खूश आहेत.
ज्या व्यक्तीच्या ट्रॉलरने हा मोठा काळ्या रंगाचा मासा पकडला गेला. ती व्यक्ती ओडिसा येथिल रहिवासी आहे. हा मासा पकडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी हा मासा पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वजन जास्त असल्यामुळे या माश्याला हालचालही करता येत नव्हती. या माश्याला दोरीने बांधून एका वॅनमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर मोहना फिशर असोशिएशनमध्ये या माश्याला नेण्यात आलं आहे.
जेव्हा या माश्याची मार्केटमध्ये बोली लावण्यात आली तेव्हा २ हजार १०० रुपये प्रतिकिलो असा भाव ठरवण्यात आला. मासेमाराला या माश्याची किंमत पूर्ण २० लाख रुपये इतकी मिळाली. लॉकडाऊनच्या काळात एका माश्यामुळे इतके पैसे मिळणं लॉटरी लागण्यासारखंच आहे.
स्थानिक मासेमार अजिरूल यांनी सांगितले की, या चिलशंकर माश्याचे वजन ८०० किलो आहे. '' या माश्याची प्रति किलो किंमत २ हजार १०० रुपये इतकी आहे. असा मासा आम्ही या आधी कधीही पाहिला नव्हता. या माश्याच्या तेलाने हाडांची औषध तयार केली जातात. तसंच पावसाळ्यात खाण्याच्या पदार्थांमध्ये माश्याचा समावेश केला जातो.''
Coronavirus : 'या' बदलांसोबत आपलं रूप बदलत आहे कोरोना व्हायरस, घाबरण्याचं कारण आहे का?
कोविड19 वर स्वस्त उपचार शोधण्यात हा देश सगळ्यात पुढे; चाचणीदरम्यान 'या' औषधानं केली कमाल