Rare Pink Diamond Found in Angola: जगाच्या कानाकोपऱ्यातून वेळोवेळी अशा काही गोष्टी समोर येत असतात ज्या लोकांना हैराण करतात. या गोष्टी खूप खास असतात. नुकताच अंगोलाच्या जमिनीत खोदकामादरम्यान टीमला एक दुर्मीळ पिंक डायमंड सापडला. असं सांगितलं जात आहे की, हा पिंक डायमंड साधारण 300 वर्षात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा आहे. या पिंक डायमंडबाबत लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. या हिऱ्याची जगभरात चर्चा होत आहे.
170 कॅरेटचा हिरा
लुकाप डायमंड कंपनीच्या गुंतवणुकादारांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, 170 कॅरेटचा गुलाबी हिरा, ज्याला द लूलो रोज म्हटलं जातं. हा हिरा लुलो खाणीत शोधण्यात आला. हा हिरा आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या गुलाबी हिऱ्यांपैकी एक आहे. आतापर्यंत इतक्या मोठ्या आकाराचा गुलाबी हिरा सापडलेला नाही.
हा फारच दुर्मीळ शोध मानला जात आहे. याबाबत सरकारही फार आनंदी आहे. अंगोलन सरकार जी या खाणीत एक पार्टनरही आहे. त्यांनी या यशाचं स्वागतही केलं आहे. अंगोलाचे खनिज संसाधन मंत्री डायमांटिनो अजेवेदो म्हणाले की, 'लूलोमधून सापडलेला हा गुलाबी हिरा अंगोलाला विश्व मंचावर एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून प्रदर्शित करणार. हा हिरा सर्वात महागडा विकला जाणार.
दरम्यान या लूलो रोजवर बरंच काम करण्याची गरज आहे. याला आपल्या खऱ्या चमकदार रूपात आणण्यासाठी कट आणि पॉलिश करण्याची गरज आहे. या पूर्ण प्रक्रियेत हिऱ्याचं वजन 50 टक्के कमी होऊ शकतं. याआधीही गुलाबी हिरे रेकॉर्ड ब्रेक किंमतीत विकले गेले आहेत. पण आतापर्यंत इतका मोठा पिंक डायमंड सापडला नव्हता. याआधी 59.6 कॅरेटचा पिंक डायमंड 2017 मध्ये हॉंगकॉंगच्या लिलावात 71.2 मिलियन अमेरिकन डॉलरला विकला गेला होता होता. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा हिरा आहे. यावेळी हा रेकॉर्ड मोडल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.