सिडनी: सोशल मीडियावर दररोज अनेक चकीत करणारे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यावर तुम्ही अनेकदा विचित्र प्रकारच्या प्राण्यांना पाहिले असेल. यात काही प्राण्यांना चार ऐवजी पाच पाय, तर काही प्राणी जन्मतः दोन तोंड घेऊन जन्म घेतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील एका झूमधला आहे. ऑस्ट्रेलियातील सॉमर्सबी येथील ऑस्ट्रेलियन रेप्टाइल पार्कमधील एक पाल सध्या आकर्षणाचा विषय बनली आहे. कारण, या पालिला चक्क दोन तोडं आहेत. अनेकदा दोन तोडांचे साप किंवा वासराचा जन्म होतो. पण, दोन तोडांच्या पालिचा पहिल्यांदाच जन्म झाला आहे. ही निळ्या जीभेची पाल संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. पण, आता ही दोन तोडांची पाल चर्चेचा विषय बनली आहे.
या दोन तोडांच्या पालिचा जन्म झाल्यानंतर पार्कच्या तज्ज्ञांकडून या दुर्मिळ पालीची उत्तम काळजी घेतली जात आहे. कॅलिफोर्नियातील रेप्टाइल प्राणी संग्रहालयाचे संस्थापक जे ब्रेवर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "व्वा...ही एक अविश्वसनीय छोटी निळ्या जीभेची पाल आहे. ही पाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही."