निसर्ग म्हणजे सर्वात मोठा जादूगार. तुम्ही निसर्गाच्या जितक्या जवळ जाल, तितका निसर्ग त्याच्या पोतडीतल्या एकापेक्षा एक सुंदर गोष्टी दाखवतो. निसर्गात नेमकं काय काय दडलंय, ते निसर्गाच्या कुशीत शिरल्याशिवाय समजत नाही. निसर्गाच्या जवळ गेल्यावर निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळते. याचा अनुभव एका फोटोग्राफरनं घेतला आहे. निसर्गाचा चमत्कार पाहून फोटोग्राफर अक्षरश: भारावून गेला. त्यानं त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Rare yellow penguin spotted by photographer)काळ्या-पांढऱ्या रंगांचे पेंग्विन तुम्ही अनेकदा पाहिले असतील. समुद्र किनारी फिरणारे शेकडो पेंग्विन म्हणजे जणू एकाच गणवेशातले विद्यार्थी दिसतात. पण तुम्ही कधी पिवळ्या रंगाचा पेंग्विन पाहिला आहे का? वाईल्ड लाईफ फोटोग्राफर इव्ह ऍडम यांनी दक्षिण जॉर्जियात २०१९ मध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पेंग्विनचा फोटो टिपला आहे. शुक्रवारी इन्स्टाग्रामवरून त्यांनी पिवळ्या पेंग्विनचा दुर्मीळ फोटो शेअर केला आहे.
दुर्मीळ! फोटोग्राफरला दिसला पिवळा पेंग्विन; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'लय भारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 1:59 PM