टोकियो - भौतिकशास्त्रातील देव म्हणून ओळख असलेल्या आणि आपल्या विविध संशोधनाने विज्ञानात क्रांती घडवणाऱ्या एका नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने आनंदी कसं राहावं याचंही सुत्र सांगितलं आहे. अल्बर्ल्ट आईन्स्टाईन हे केवळ शास्त्रज्ञ नसून त्यांनी जीवनात आनंदी आणि सुखी राहण्यासाठी काही सुत्र आयुष्यात अवलंबली होती. त्याच सुत्रांपैकी दोन सुत्र त्यांनी एकदा एका कागदावर लिहून ठेवली होती. तोच कागद आता तब्बल ९५ वर्षांनी जेरुसलेममध्ये सापडला आहे.
यात ते सांगतात, सतत यशाच्या मागे धावल्याने आपण सुखी होत नसून शांत आणि विनम्र स्वभावानेच आपल्या आयुष्यात आनंद नांदतो. तर दुसऱ्या सुत्रात त्यांनी लिहिलं आहे की इच्छा असेल तर मार्ग सापडतोच.एकदा १९२२ साली आईन्स्टाईन जपानमध्ये प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी भाकित वर्तवलं होतं की, मला एकदा तरी नोबेल पारितोषिक नक्कीच मिळेल. त्याचवेळेस ते टोकीयोमधल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा तेथील वेटरला द्यायला त्यांच्याकडे सुट्टे पैस नसल्याने त्यांनी त्यांच्या हाताने लिहिलेली एक कागद वेटरच्या हातात दिला. एवढ्या मोठ्या इसमाने आपल्याला त्यांच्या हाताने लिहिलंल काहीतरी दिलं याचाच आनंद त्या वेटरला झाला.
आईन्स्टाईन यांनी त्यांच्या हाताने लिहिलेली सुखी आयुष्याच्या सुत्रांचा कागद आता सापडला असून या कागदांचा लिलाव करण्यात आला. आईन्स्टाईन यांचे विचार सतत आपल्या सोबत राहण्यासाठी या लिलावात अनेकांनी सहभाग घेतला. त्यांचा पहिला कागद जवळपास २ हजार डॉलरला विकला गेला आहे तर दुसरा कागद तब्बल दोन लाख डॉलरला विकला गेला. मात्र हे कागद कोणी विकत घेतले याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आईन्स्टाईनंनी हे जेरुसलेममधील ह्रिब्रू युनिव्हर्सिटीचे संस्थापक होते. त्यामुळे त्यांचे अनेक दस्ताऐवज त्याठिकाणी आढळतात.
सौजन्य- www.thesun.co.uk