शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
2
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
3
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
4
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
6
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
7
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
8
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
9
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
10
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
11
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
12
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
13
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
14
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
15
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
16
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
17
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
18
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
19
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
20
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर

पाहा आता कसा दिसतो रिअल लाईफ मोगली, शिक्षण घेऊन झालाय मोठा माणूस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 7:53 PM

जन्मजात दोषामुळे झांझिमान एल्लीचा लूक (Look) इतर मुलांपेक्षा वेगळा होता. गावातल्या व्यक्ती त्याला माकड (Monkey) म्हणून चिडवायचे. या गोष्टीला चिडून तो घरातून पळून जायचा. त्याचे हावभाव बघून लोक त्याला मोगली म्हणू लागले. परंतु, आता झांझिमानमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.

आपण लहानपणी जंगल बुकमध्ये (Jungle Book) मोगलीची (Mogli) गोष्ट वाचली आहे; मात्र जगात अशा अनेक व्यक्ती आहेत, की ज्यांना खऱ्या आयुष्यातही मोगली संबोधलं जायचं. या व्यक्ती जन्मापासून जंगलात (Forest) राहत असल्याने त्यांची वर्तणूक माणसाऐवजी प्राण्यांसारखी होती. यामुळे त्या व्यक्तीची प्राण्यांशी घट्ट मैत्री झाली आणि त्या त्यांच्यातल्याच एक झाल्या होत्या. खऱ्या जीवनात प्राण्यांमध्ये राहिल्यामुळे या व्यक्ती प्राण्यांसारख्याच वागत होत्या. त्यांना जेव्हा जंगलातून पकडून आणलं गेलं तेव्हा ते जनावरांसारखे चार पायांवर चालत होते. आफ्रिकेच्या रवांडामधील  झांझिमान एल्ली (Zanziman Ellie) हा त्यांच्यापैकीच एक रिअल लाइफ मोगली होता.

काही काळापूर्वी त्याची जंगलात गवत खात असतानाची छायाचित्रं समोर आली होती. आई-वडिलांनी त्याला सोडलं नव्हतं, तरी तो स्वतःच वारंवार जंगलात पळून जायचा. जन्मजात दोषामुळे झांझिमान एल्लीचा लूक (Look) इतर मुलांपेक्षा वेगळा होता. गावातल्या व्यक्ती त्याला माकड (Monkey) म्हणून चिडवायचे. या गोष्टीला चिडून तो घरातून पळून जायचा. त्याचे हावभाव बघून लोक त्याला मोगली म्हणू लागले. परंतु, आता झांझिमानमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.

प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर झांझिमान एल्लीच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. आता झांझिमान ड्रेस परिधान करून शाळेत (School) जाऊ लागला आहे. `मुलामध्ये झालेलं परिवर्तन ही एक जादू आहे,` असं त्याची आई म्हणते. एक दिवस झांझिमान एल्ली सर्वसामान्य मुलांप्रमाणे जीवन जगू शकेल, अशी कल्पना रवांडा येथे राहणाऱ्या या कुटुंबाने कधीही केली नव्हती. आजारपणामुळे त्याचं जगणं आणि स्वरूप हे सगळं काही हरवलं होतं. त्यामुळे झांझिमान एल्लीला लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते.

जेव्हा झांझिमान एल्ली चर्चेत आला तेव्हा ही गोष्ट एका चित्रपट क्रूपर्यंत (Cinema Crew) पोहोचली. त्यानंतर ही मंडळी आफ्रिकेत गेली. त्यानंतर त्यांनी झांझिमान एल्लीच्या जीवनावर आधारित एक डॉक्युमेंटरी (Documentary) बनवली. या डॉक्युमेंटरीमुळे झांझिमानचं आयुष्य बदलून गेलं. आता तो कुटुंबीयांसोबत गावात राहतो. तसंच तो शाळेत जाऊन शिक्षणही घेत आहे. ज्या मुलाला गावातले लोक चिडवत होते, तेच लोक आता त्याच्याविषयी आपुलकी व्यक्त करतात. झांझिमानमुळे त्याचं गाव जगात पोहोचलं आहे.

झांझिमान एल्लीचा जन्म 1999 मध्ये झाला होता. परंतु, विचित्र दिसण्यामुळे लोक त्याची चेष्टा करत होते. त्यामुळे तो बहुतांश वेळ जंगलात राहत असे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके