शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
3
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
4
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
5
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
6
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
7
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
8
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
9
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
10
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
11
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
12
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
13
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
14
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
15
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
16
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
17
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
18
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
19
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
20
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  

सेल्फी घेण्यास किंवा मेकअप करण्यासाठी नाही तर 'या' कारणाने लिफ्टमध्ये असतात आरसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:25 PM

Reason mirror in Elevator : लिफ्टमध्ये आजकाल संगीतही ऐकायला मिळतं, आरशेही लागलेले असतात. पण लिफ्टमध्ये आरसा का असतो? याचं कारण तुम्हाला माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Reason mirror in Elevator : आजकाल सगळीकडे इमारती खूप वाढत आहेत. इमारत म्हटली की, लिफ्टचं किती महत्व असतं हेही तुम्हाला माहीत असेलच. कारण लांबच लांब इमारतीमधील पायऱ्या चढत जाणं फारच अवघड काम असतं. तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर पायऱ्या चढत जायचं म्हटलं तरी दम लागतो. तर मग १०, १५ किंवा २० व्या मजल्यावर कसं चढलं जाणार. याच कारणाने लिफ्टचा शोध एक मोठी बाब मानली जाते.

आजकाल वेगवेगळे मॉल्स, इमारतींमध्ये वेगवेगळ्या डिझाइनच्या डेकोरेटेड लिफ्ट असतात. अर्थातच लिफ्टमध्ये वापरलेल्या गोष्टींची वापरही फार विचारपूर्वक केला असेल. लिफ्टमध्ये आजकाल संगीतही ऐकायला मिळतं, आरशेही लागलेले असतात. पण लिफ्टमध्ये आरसा का असतो? याचं कारण तुम्हाला माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

झालं असं की, सुरूवातीला लिफ्टमध्ये लोक उभे रहायचे तेव्हा त्यांच्याकडे करण्यासारखं काही नसायचं. त्या काळातील लिफ्ट फारच हळूहळू खाली-वर जायच्या यायच्या. अशात लोकांना खूप कंटाळा यायचा. लोक तक्रार करू लागले होते. अशात लिफ्ट कंपन्यांनी ही समस्या दूर कशी करायची यावर विचार केला. कंपन्या वेगवेगळे उपाय करत होते. ज्यासाठी पैसेही खूप लागत होते.

अशात एका कंपनीचा इंजिनिअर म्हणाला की, तक्रार करणारे लोक मुर्ख आहेत. आपल्या लिफ्टचा स्पीड बरोबर आहे. या कंपनीने लिफ्टच्या वेगात बदल करण्यापेक्षा लोकांचा कंटाळा कसा घालवता येईल यावर विचार केला. 

या कंपनीने लिफ्टमध्ये चढणाऱ्या लोकांच्या विचारांचा अभ्यास केला. ते असा का विचार करतात? याचा विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, लोकांना लिफ्टमध्ये करण्यासाठी काहीच नसतं. फक्त भींतीकडे पाहणे आणि लिफ्ट पडणार तर नाही ना! या गोष्टीचा विचार करणे इतकंच त्यांच्या मनात सुरु असतं. यातून असा विचार समोर आला की, लिफ्टमध्ये आरसा लावल्यास लोकांचं लक्ष भीतीवरुन डायव्हर्ट करता येऊ शकतं. आरसा लावल्यास ते केस नीट केले नाही हे बघू शकतात. महिला त्यांचं मेकअप कसं झालंय, हे बघू शकतात. 

या कंपनीने त्यांच्या लिफ्टच्या स्पीडमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यानी लिफ्टमध्ये फक्त आरसे लावले. त्यानंतर लोकांना विचारणा केली की, आता लिफ्टचा वेग कसा वाटतो? त्यावर अनेकांनी वेग बरोबर असल्याची उत्तरे दिली. मुळात त्या लिफ्टच्या वेगात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पण हे करण्यामागे माणसशास्त्रीय कारण होतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके