शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

वीज बिल कमी करण्यासाठी 'या' स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा, 50 टक्क्यांपर्यंत कमी होईल खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 3:07 PM

How To Reduce Electricity Bill : जर तुम्हीही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त असाल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही वीज बिल कमी करू शकता.

नवी दिल्ली : उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक आपापल्या घरात एसी आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. एसी आणि कुलर जास्त चालत असल्याने अचानक वीज बिलात वाढ होत आहे. या महागाईच्या जमान्यात जनता यामुळे त्रस्त झाली आहे. जर तुम्हीही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त असाल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही वीज बिल कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पद्धतीने तुम्ही वीज बिल 50 टक्के टक्क्यांनी कमी करू शकता...

1. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रेटिंग विचारात घ्या..देशात स्मार्ट इलेक्ट्रिक प्रोजेक्टचा कल झपाट्याने वाढत आहे. आजकाल ग्राहक कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याचे रेटिंग तपासतात. या रेटिंगचा अर्थ आहे की तुमचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन किती कमी वीज वापरते. 5 स्टार रेटिंग असलेल्या उत्पादनांद्वारे सर्वात कमी वीज वापर केला जातो. अशा परिस्थितीत, जास्तीत जास्त रेटिंगसह उत्पादने खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

2. एसीचे तापमान इतके ठेवाजर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या घराचे वीज बिल कमी करायचे असेल तर तुमच्या एसीचे तापमान 24 डिग्रीवर ठेवावे. आजच्या काळात विंडो एसी (Window AC) असो की स्प्लिट एसी (Split AC) बहुतेकांचा वापर सुरू झाला आहे. 24 डिग्री तापमानात अशाप्रकारे चालवून, आपण दीर्घकाळ कमी वीज वापरून कूलिंग होण्याचा फायदा घेऊ शकता.

3. दिवसा लाइट बंद ठेवाजर दिवसा तुमच्या घरात सुर्याचा प्रकाश येत असेल तर अशा वेळी लाईट बंद ठेवा. याद्वारे तुम्ही वीज बिलात कपात करू शकता. तसेच घरातील प्रत्येक खोलीत एलईडी बल्ब लावावेत. यामुळे बिलातही सुमारे 50 टक्के कपात होईल. तुम्ही वापरत नसलेले इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स बंद करून ठेवा.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेelectricityवीज