लंडन : पन्नास वर्षांपासून राहात असलेले घर सोडायला हट्टी सेवानिवृत्त मायकेल क्रॉसमन (७५) यांनी नकार दिला आहे. क्रॉसमन ज्या ठिकाणी राहतात तेथील त्यांच्या सगळ््या शेजाऱ्यांनी घरे सोडली आहेत. १९६० मध्ये बांधलेले हे घर सोडून जा, असे अनेकवेळा गेट्सशेड कॉन्सिलने त्यांना म्हटले. कॉन्सिलला ही घरे पाडून नवी बांधायची आहेत. दोन बेडरूमचे येथे २५८ फ्लॅट्स पुन्हा बांधून तयार झाले आहेत. क्रॉसमन यांनी कोणताही संघर्ष न करता घर रिकामे करायला नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे असे की,‘‘मी हा फ्लॅट विकत घेतला असून माझी दिवंगत पत्नी मेरी हिच्या आठवणींनी तो भरून गेला आहे. कॉन्सिल जी रक्कम देत आहे त्यातून दुसरीकडे मला घर मिळणार नाही.’’ तीन वर्षांपूर्वी मेरी क्रॉसमन यांचे निधन झाले. कॉन्सिलने क्रॉसमनना ६२,५०० पौंड देऊ केले आहेत. ‘‘मला हे घर सोडायला काही अडचण नाही. परंतु मेरीच्या आठवणी मागे ठेवून घर सोडणे वाईट ठरेल. हे तिचे घर होते. येथील प्रत्येक गोष्ट तिने निवडलेली होती,’’ असे मायकेल क्रॉसमन म्हणाले. मला हे घर सोडायचे नाही परंतु ते सोडावे लागेल हेही खरे. पण जो पैसा दिला जात आहे त्यात दुसरीकडे घर मिळणार नाही, असे क्रॉसमन म्हणाले.
दिवंगत पत्नीच्या आठवणींसाठी वृद्धाचा घर सोडायला नकार
By admin | Published: July 03, 2017 12:44 AM