Relationship News: आयुष्यात कोण, कधी, कुणाच्या प्रेमात पडेल हे काहीच सांगता येत नाही. एका शाळेत स्टुंडेंट्स प्रोग्रेस मेंटरचं काम करणाऱ्या महिला शिक्षिकेसोबत असंच काहीसं झालं. ती तिच्या 15 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये आधी सामान्य बोलणं सुरू झालं. पण नंतर त्यांचं अॅडल्ट चॅटींग सुरू झालं. त्याच्या प्रेमात पडलेल्या महिलेने 3 महिन्यात त्याला 3 हजारांपेक्षा जास्त हॉट मेसेजेस पाठवले. दोघांमध्ये सहमतीने अनेकदा शारीरिक संबंधही झाले. पण एका चुकीमुळे या नात्याचा भांडाफोड झाला आणि आता महिलेला अटक होऊ शकते.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, आरोपी महिलेचं नाव एलन कॅडमॅन स्मिथ आहे. ती ब्रिटेनच्या इसले ऑफ व्हाइट भागात राहणारी आहे. या महिलेला एक वर्षाचं बाळही आहे. रिपोर्टनुसार 24 वर्षीय लेडी टीचरने पर्सनॅलिटी डेवलपमेंटमध्ये स्टुडेंटला मदत केली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता आणि नंतर दोघांनी एकमेकांना नंबर दिले होते. स्टूडेंटने टीचरचं नाव E म्हणून सेव केलं होतं.
दोघांनी ठेवले शारीरिक संबंध
रिपोर्टनुसार दोघेही शाळेत असताना एकदम सहज राहते होते आणि आपलं रिलेशनशिप लपवून ठेवत होते. पण शाळेनंतर दोघेही नेहमीच कारमध्ये भेटत होते. महिला त्याला बाहेर फिरायला घेऊन जात होती. महिलेने आधी त्याला काही इमोशनल मेसेज सेंड केले होते. नंतर तिने त्याला सांगितलं की, मी तुझ्याबाबत सतत विचार करत असते. जेव्हा स्टूडेंटने यावर रिप्लाय दिला तर महिला आणखी खुलली. शेवटी एक दिवस तिने तिच्या मनातलं त्याला सांगितलं. त्यानंतर दोघांनी अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले.
एका वेबसाइट रिपोर्टनुसार दोघांचं नातं सहजपणे पुढे जात होतं. पण एक दिवस स्टूडंटच्या आईने महिलेचे मेसेज वाचले. त्यानंतर तिने लगेच पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. नंतर पोलिसांनी फोन नंबरच्या आधारावर कॅडमिन स्मिथला अटक केली. पण मानसिक तणावाची समस्या असल्याने तिला जामीन मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे स्टूडंटसोबत रिलेशन सुरू असताना महिलेचा एक दुसरा बॉयफ्रेंडही होता.
कोर्टात हजर केल्यवर जजने महिलेला चांगलंच खडसावलं. जज म्हणाले की, दोघांमध्ये सहमतीने का होईना शारीरिक संबंध झाले आहेत. जो कायद्याने गुन्हा आहे. यासाठी महिला जबाबदार आहे. सध्या या केसबाबत सुनावणी सुरू आहे. महिलेला याप्रकरणी 5 वर्ष सेक्स ऑफेंडरच्या लिस्टमध्ये ठेवलं जाऊ शकतं. सोबतच तिला लहान मुलांसोबत काम करण्यासाठी अयोग्य ठरवण्यात आलं आहे.