मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये कोरोनापासून बचावसाठी प्राचीन मंदिराचे नाव कोरोना महादेव ठेवण्यात आलं आहे. हे काम कोणत्याही सामान्य माणसाने नाही तर पोलिसाने केलं आहे. रिटायर्ड होताना त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. या ठिकाणी भगवान शंकराच्या मुर्तीची स्थापना करून महादेवाला कोरोना वाले महादेव असं नाव देण्यात आलं आहे.
मध्यप्रदेशातील बैतुल जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर चिचोली कस्बे स्टेशन परिसरात कोरोना महादेवाचे मंदीर लोकांच्या चर्चेचा विषय बनले आहे. कोरोनाच्या माहामारीतून लोकांना वाचवण्याासाठी या महादेवाचे नावं कोरोना महादेव ठेवलं आहे. लॉकडाऊनमध्ये या मंदिरात सध्या पुजा पाठ करण्याासाठी परवागनी देण्यात आलेली नाही. पण दोन-तीन लोक या ठिकाणी येऊन मंदिरातील शंकर भगवानांची पुजा करत आहेत.
असं मानलं जातं की, महादेवाच्या आर्शिवादाने या परिसरात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. या परिसरातील शिवमंदिर खूप जुनं आहे. अनेक वर्षांपूर्वी या मंदिरातली मुर्ती खंडीत झाली होती. अशा स्थितीत टीआई आरडी शर्मा यांनी या ३१ मे ला या मुर्तीचा जीर्णोद्धार केला आहे. तसंच नवीन मुर्तीची स्थापना केली आहे. संगमरवरापासून ही मुर्ती तयार करण्यात आली आहे.
शी जिनपिंगच्या छोट्या भावाच्या पत्नीला चीनची मर्लिन मुनरो का म्हटलं जातं?
नोकरीच्या शेवटच्या दिवशी ऑफिसच्या फरशीवर झोपले आयपीएस अधिकारी, फोटो व्हायरल