घरात एखादा अनोळखी जीव किंवा प्राणी घुसला की त्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम ( बचावकार्य करणारी टीम) बोलावली जाते. पण, अशी एक घटना समोर आले की घरात घुसलेला हा पाहुणा पाहून रेस्क्यू टीमलाही बूचकळ्यात टाकले. त्याला पकडावे तर कसे, हा प्रश्न त्यांना पडला. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर त्या पाहुण्याला पकडण्यात यश आले आणि रेस्क्यू टीमनं त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले. लंडनच्या RSPCA Frontline रेस्क्यू टीमनं हा सर्व अनुभव त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
प्राण्यांच्या बचावासाठी ही टीम काम करते. घरात एक अनोळखी प्राणी घुसल्याचा फोन त्यांना आला. घटनास्थळी पोहोचल्यावर त्या प्राण्याला पाहून टीमलाही आश्चर्य वाटले. तो एक आफ्रिकन बुल फ्रॉग होता.
'अंडरटेकर'वर कोसळला दुःखाचा डोंगर; मोठ्या भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी जग आतुर; शोएब मलिकचा दावा
कोरोनाची धास्ती; हेल्मेट घालून खेळाडू करतोय कसरत, पाहा PHOTO!