दीपाली दिवेकर (समुपदेशक)करिअर म्हटले की मेडिकल किंवा इंजिनीअरिंग हे दोनच पर्याय अनेकांच्या डोळ्यांसमोर येतात. मात्र याव्यतिरिक्त संशोधनाचे एक व्यापक क्षेत्र जिनीयस मुलांची वाट पाहत आहे. शिवाय यासाठी अनेक स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत. संशोधनात करिअर करायचे असेल तर त्यासाठी ११वी, १२वीपासूनच तयारी करायला हवी. संशोधनाची संधी ज्या संस्थांमधून मिळू शकेल त्याचा हा आढावा. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (ITSER) १२वी विज्ञानानंतर या संस्थांमधून B.S.-Ms. Dual Degree करता येते. पुणे, भोपाळ, मोहाली, थिरूअनंतपुरम्, कोलकाता आणि तिरूपती अशा सहा ठिकाणी सध्या या संस्था आहेत. ओडिशा व नागालँड येथेही सुरू होणार आहेत. ५ वर्षांच्या या कोर्समध्ये पहिली दोन वर्षे सर्व विज्ञान विषयांचा बेसिक अभ्यास, तिसऱ्या व चौथ्या वर्षी निवडलेल्या विज्ञान विषयात सखोल अभ्यास व शेवटच्या वर्षी रिसर्च प्रोजेक्ट असे त्याचे स्वरूप असते. हे विद्यार्थी ङश्ढ( किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) किंवा कठरढकफए स्कॉलरशिपसाठी पात्र असतात. महिना ५ हजार रुपये स्टायपेंडची व्यवस्था आहे.येथे प्रवेश घेण्याचे ३ मार्ग आहेत> किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना SX/SX/SB - या लेव्हल्स ११वी-१२वीत असताना देता येतात.
> JEE - Advanced
> स्टेट आणि सेंट्रल बोर्डाचे इस्पायर फेलोशिप मिळालेले विद्यार्थी यांची अॅप्टिट्युड टेस्ट देऊ शकतात. www. iiseradmission.in> इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, बेंगलोरच्या (IISC) www.iisc.ernet.in संस्थेमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, मटेरियल्स, अर्थ अॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्स या विषयांत बॅचलर आॅफ सायन्स (रिसर्च) करता येते. KVP व INSPIRE स्कॉलरशिप्स येथेही लागू आहेत.१ युनिव्हर्सिटी मुंबई- डिपार्टमेंट आॅफ अॅटॉमिक एनर्जी सेंटर फॉर बेसिक सायन्स २ नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या ठिकाणी TIFR, BARC, IIT येथील तज्ज्ञ फॅकल्टीजकडून शिकण्याची संधी मिळते. विज्ञानातील मूलभूत ज्ञान जाणून घ्यायचे असेल तर या संशोधन संधीचा जरूर विचार करा. शुद्ध विज्ञानात अधिकाधिक जिनियस मुलांनी यावे यासाठी केंद्र शासन इ.२ू - ट२ूसाठी इन्स्पायर फेलोशिप देते; शिवाय किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेद्वारे पुढील शिक्षण स्कॉलरशिपवर पूर्ण करता येते.
च्देशाला खूप गरज आहे संशोधकांची. मधल्या काळात इंजिनीअरिंग, मेडिकलकडेच ओढा वाढल्यामुळे संशोधन क्षेत्रात एक पोकळी निर्माण होऊ पाहत आहे.प्रवेशासाठी निवड>किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना > JEE Main
>इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी थिरूअनंतपुरम् (ककरळ) ६६६. ्र्र२३ंू.्रल्ल१२वी विज्ञानानंतर या संस्थेत तीन कोर्सेस उपलब्ध आहेत.१ बी.टेक. (एरोस्पेस इंजिनीअरिंग ) २ बी.टेक. (अॅव्हॉनिक्स)
नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट www.nestexam.inच्या परीक्षेद्वारे ५ वर्षांच्या इंटिग्रेटेड MSc साठी अॅडमिशन घेता येते. बायोलॉजिकल, के मिकल, मॅथेमॅटिकल, फिजिकल सायन्सेस या विषयांमधून ट.रू करता येते. २ ठिकाणी हा कोर्स करता येतो.