हॉलिवूडचा 'हॅरी पॉटर' चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. जादुई दुनियेची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात अनेक अद्भुत गोष्टी पाहायला मिळतात. अशीच एक गोष्ट म्हणजे गायब होण्याचा ड्रेस. हा ड्रेस घालणारा व्यक्ती गायब होतो, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. खऱ्या आयुष्यातही अशाच प्रकारचा ड्रेस बनवण्यात आला आहे.
तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा शर्ट घालून तुम्ही गायब होऊ शकता. एक मजेशीर बाब म्हणजे, तुम्ही खऱ्या जगात गायब होणार नाही, तर व्हर्युअल जगात गायब व्हाल. याच्या मदतीने तुम्ही आधुनिक AI यंत्रणा फसवू शकता. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडने फेसबुक आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी हातमिळवणी करून अदृश्य करणारा शर्ट तयार केला आहे.
याच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा आधुनिक AI कॅमेऱ्यापासून लपवू शकता. दरम्यान, मशीन लर्निंग सिस्टममधील बग किंवा त्रुटी शोधण्यासाठी, हा गायब होणारा शर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये अनोख्या प्रिंटचे कपडे परिधान केल्यावर एआय कॅमेरे ते पाहू शकत नसल्याचे आढळून आले. AI कॅमेऱ्यांना टाळण्यासाठी हे विशेष शर्ट तयार करण्यात आले आहेत. यावरील पॅटर्न AI कॅमेऱ्यांना गोंधळात टाकतात.