काही लोक हौसेसाठी काहीही करतात. चर्चेत राहण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. जपानमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने जंगली प्राण्यासारखे दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्याचा कारनामा वाचल्यानंतर, सर्वच हैराण झाले आहेत. लांडग्यासारखे दिसण्यासाठी तरुणाने तब्बल 18 लाख रुपये खर्च केले आहेत.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, या तरुणाने Zeppet नावाच्या कंपनीला लांडग्यासारखे दिसण्यासाठी 3,000,000 येन (18.5 लाख रुपये) दिले. नाव न सांगण्याची विनंती करणारा तरुण म्हणाला, "मला लहानपणापासून प्राण्यांची आवड होती. टीव्हीवर दिसणार्या प्राण्यांसारखे दिसण्याचा प्रयत्न करायचो. म्हणूनच मी खूप पूर्वी विचार केला की मी एखाद्या प्राण्यासारखा दिसायला पाहिजे."
तरुण अनेक वेळा स्टुडिओत त्याच्या फिटिंगसाठी आणि मोजमापासाठी आला होता. कंपनीने सांगितले की, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आम्हाला लहान-लहान गोष्टींवर काम करावे लागले. वुल्फ ड्रेस तयार करण्यासाठी सुमारे 50 दिवस खर्च करावे लागलेत. त्याच वेळी, लांडग्याचा पोशाख घातल्यानंतर, तो तरुण कंपनीच्या कामाने खूप प्रभावित झाला. मी जसा विचार केला तसाच दिसतोय, असं तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला, की "ड्रेसमध्ये अद्याप काही गोष्टी बाकी आहेत. पण स्वतःला आरशात बघून आश्चर्य वाटते. हा तो क्षण आहे, जेव्हा माझे स्वप्न सत्यात उतरताना पाहतोय. यात मागच्या पायावर चालणाऱ्या खऱ्या लांडग्यासारखं दिसणं, हे अवघड काम होतं. पण संपूर्ण सूट माझ्या विचाराप्रमाणेच दिसत आहे." कंपनीने सांगितले की, आम्ही प्राण्यांचा पोशाख डिझाईन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी टोको नावाच्या व्यक्तीने स्वतःला कुत्र्याचे रूप दिले होते. एका पोशाखासाठी त्याने 12 लाख खर्च केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"