शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

काहीच काळात झाला कोट्यावधींंचा मालक, पण आता म्हणतो माझी नोकरीच बरी, काय कारणं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 5:16 PM

श्रीमंतीमुळे आपल्याला सर्वकाही सुख मिळेल असंच बहुतेकांना वाटतं. पण एक व्यक्ती मात्र श्रीमंतीला अक्षरशः वैतागली आहे. या व्यक्तीने इतका पैसा कमावला की ती आता कोट्यवधींची मालक आहे, पण आता मात्र नोकरीच बरी असं ही व्यक्ती सांगते (Rich man missing job).

आपल्याकडे भरपूर पैसा असावा, आपण श्रीमंत (Rich man) असावं असं कुणाला वाटत नाही. काही जणांना तर झटपट पैसा हवा असतो. त्यासाठी ते बऱ्याच मार्गांनी पैसा कमावतात. श्रीमंतीमुळे आपल्याला सर्वकाही सुख मिळेल असंच बहुतेकांना वाटतं. पण एक व्यक्ती मात्र श्रीमंतीला अक्षरशः वैतागली आहे. या व्यक्तीने इतका पैसा कमावला की ती आता कोट्यवधींची मालक आहे, पण आता मात्र नोकरीच बरी असं ही व्यक्ती सांगते (Rich man missing job).

पैशाने काहीही खरेदी करता येतं, असं तुम्हाला वाटत असेल तर बक्कळ पैसा असलेली ही श्रीमंत व्यक्ती जे म्हणाली ते समजलं तर तुम्हाला धक्काच बसेल. बिटकॉईनमार्फत कोट्यधीश झालेली ही व्यक्ती श्रीमंत झाल्यानंतरही सुखी नाही. आपण कमावलेल्या पैशांवर खूश नाही. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या  ३५ वर्षांच्या या व्यक्तीला आपली नोकरी आणि रूटिनची तिला खूप आठवण येते. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार आपली ओळख सांगता या व्यक्तीने श्रीमंतीचा आपला अनुभव रेडिट या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा अनुभव वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

या व्यक्तीने सांगितलं, २०१४ साली त्याने बिटकॉईनबाबत माहिती मिळवायला सुरुवात केली. पुढील दीड वर्षे त्याने क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे लावले. आपली संपूर्ण सेव्हिंग त्याने बिटकॉईनमध्ये गुंतवली आणि आपलं नशीब आजमावलं. 2017 साली त्याचं नशीब फळफळलं. त्याला तब्बल २० कोटी रुपयांचा फायदा झाला. २०१९ साली त्याने ६२ कोटी रुपयांपेक्षाही जास्त पैसे कमावले. त्यानंतर त्याचं आयुष्यच बदललं. आता इतका पैसा असेल तर कोन कशाला नोकरीत मेहनत कशाला करत राहिल. कुणीही नोकरी सोडेलच. या व्यक्तीनेही आपली नोकरी सोडली. पण आता त्याला आपलं आयुष्य बोरिंग वाटतं आहे. ऑफिसच्या कामाची त्याला आठवण येत आहे.

व्यक्ती म्हणाली, पैशांनी तो खूप काही खरेदी करू शकतो. पण त्याला ते जुने दिवस हवेत जे तो इच्छा असूनही खरेदी करू शकत नाही किंवा जगू शकत नाही. हे पैसे चीटिंग करून मिळाले आहेत मेहनतीने नाहीत. आता मला वाटतं मी माझ्या आयुष्याच चीट कोड वापरला. माझ्या नोकरीवर माझं खूप प्रेम होतं. नोकरीमुळे आयुष्यात एक उत्साह होता. फक्त करोडपती बनल्यामुळे हा अनुभव पुन्हा जगणं अशक्य आहे. आता आपलं आयुष्य मजेशीर कसं बनवणार हे मला माहिती नाही.

रिपोर्टनुसार ही व्यक्ती आधी कन्टेन्ट क्रिएटर होती. त्याचा महिन्याचा पगार 25 लाख रुपये होता. आपला पगार महागड्या वस्तूंवर खर्च न करता त्याने बिटकॉईनमध्ये गुंतवले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके