आजही जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे विचारलं तर कुणीही बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, वॅरन बफेट आणि कारलोस स्लिम अशी नावे पटापट सांगतील. भारतातील मुकेश अंबानी यांचं नाव घेतलं जाईल. पण याआधी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण होता याबाबत माहिती समोर आली आहे.
जॅकब फग्गर असं या जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव होतं. त्याला 'द रिच वन' म्हणूनही ओळखलं जायचं. हा जर्मन बॅंकर आणि व्यापारी १४२९ ते १५२५ दरम्यान सर्वात श्रीमंत होता. त्याने त्यावेळी आजचे ४०० बिलियन डॉलर म्हणजेच २५ खरब इतकी कमाई केली होती. त्यांना त्यांच्यावरील 'द रिचेस्ट मॅन हू एवर लिव्ड' पुस्तकात इतिहासातीस सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगण्यात आलं आहे.
जॅकबची आत्मकथा लिहिणारे आणि वॉल स्ट्रीट जनरलचे माजी संपादक ग्रेग स्टाइनमेट्ज यांनी बीबीसीला सांगितले की, 'जॅकब हा जगातला आतापर्यंतचा सर्वात शक्तीशाली बॅंकर होता. त्या काळात जग रोमन साम्राज्य आणि पोप चावलत होते. फग्गर या दोघांनाही पैसा पुरवत होता. इतिहासात असा एकही व्यक्ती नव्हता, ज्याच्याकडे इतकी राजकीय ताकद असेल'.
(हाऊसिंग सोसायटी)
पूर्वीच्या काळातील अनेक श्रीमंत लोकांबाबत लोकांना माहिती आहे. पण मग फग्गरबाबत का काहीच माहिती नाही? ग्रेग यांनी यावर सांगितले की, 'असं असण्याचं कारण म्हणजे फग्गर हा जर्मन होता आणि तो इंग्रजी भाषा बोलणाऱ्या जगात ओळखला गेला नाही. मला त्याच्याबाबत इंग्रजीत काही वाचायलाच मिळालं नाही'.
ते सांगतात की, 'फग्गर हा काही फार रंगीन माणून नव्हता. त्याचं सर्वात प्रसिद्ध काम म्हणजे फग्गराई. म्हणजे एक सामाजिक हाउसिंग प्रोजेक्ट. हे त्याने दक्षिण जर्मनीच्या ऑग्सबर्गमध्ये तयार केलं होतं. फग्गरचं हे काम आजही जर्मनीत प्रसिद्ध आहे. कारण यात राहणारे लोक आजही वर्षाचं भाडं केवळ १ डॉलर म्हणजे केवळ ६४ रूपये देतात.
ग्रेग यांनी सांगितले की, 'बॅक त्या काळात जरा लपून काम करणं पसंत करत होत्या. फग्गरच्या काळात आर्थिक उलाढाली फार कमी होत होत्या. श्रीमंत लोक आपल्या जमिनीवर आणि शेतकऱ्यांवर अवलंबून राहत होते. तर शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनती बदल्यात सुरक्षा मिळत होती. फग्गरने कर्ज देण्याच्या बदल्यात मायनिंग राइट्स म्हणजे कर्ज खोदकाम करून चुकवण्याचा मार्ग अवलंबला. असं करून त्याने तांबे आणि चांदीच्या व्यापारात एकाधिकार मिळवला. तसेच त्याने मसाल्यांचा व्यवसाय केला.
पूर्वी बॅंकांनी कर्ज देण्याला कॅथलिक चर्च परवानदी देत नव्हते. हे त्यावेळी चुकीचं मानलं जात होतं. फग्गर ने पोप लियो-५ ला संपर्क करून हा बॅन हटवण्याची मागणी केली. फग्गरने सूचना दिली की, लोक ऑग्सबर्गच्या बॅंकेत पैसा जमा करतील, त्यांना वर्षाला ५ टक्के व्याज दिलं जाईल. त्यावेळी फग्गर ३३ वर्षांचा होता. तेव्हाच कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला होता.