कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. या कोरोना संकट काळात अनेक लोक आपापल्या घरीच आहेत. तसेच, सोशल डिस्टंसिंगचे पालन करत आहेत. सतत हात धुवत आहेत. याशिवाय, कोरोनापासून बचाव करण्यासाठी कॅब आणि रिक्षावाले प्लास्टिक कव्हर बसवित आहेत.
दरम्यान, यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कोरोना व्हायरस टाळण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या रिक्षामध्ये वॉश बेसिन बसविला आहे. तसेच, त्याला पाण्याची बाटलीही बसविली आहे.
हा व्हिडिओ ऑटोवाला नावाच्या ट्विटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहिले तर चालक रिक्षा चालवत आहे. त्याच्यामागे वॉश बेसिन बसविला आहे. तसेच, त्याठिकाणी हँड वॉस सुद्धा ठेवण्यात आले आहे. याशिवाय, रिक्षा चालकाने ऑटो फ्लॅशिंग ठेवले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'कोरोना व्हायरसचा धोका अजिबात घ्यायचा नाही.'
याचबरोबर, हा व्हिडिओ १५ जून रोजी शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत ६ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, २०० हून अधिक लाईक्स आणि ७० हून अधिक रिट्विट करण्यात आले आहेत.
दरम्यान, एकीकडे देश अनलॉक करून हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांनी वेग घेतलेला असतानाच देशातील विविध भागात कोरोनाचा फैलावही चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १४ हजार ८२१ नवे रुग्ण सापडले असून, या २४ तासांत ४४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १४ हजार ८२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख २५ हजार २८२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४४५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देशात कोरोमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे. देशामध्ये सध्या कोरोनाचे एक लाख ७४ हजार ३८७ अॅक्टिव्ह रुग्ण असून, आतापर्यंत दोन लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आणखी बातम्या...
चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार जैसे थे!
ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा
"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"
Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!
राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला, 'तुझ्या पोटी घेईन पुनर्जन्म!'