Pacific Ocean weird news: समुद्रात बुडालेले जहाज, खजिना, अजब मासे सापडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण जर समुद्राच्या खोलात जाऊन कुणासमोर एक रस्ता दिसला तर कुणीही हैराण होईल. काही संशोधकांसोबत प्रशांत महासागरात असंच काहीसं झालं. त्यांना समुद्राच्या खोलात एक पिवळ्या रंगाचा रस्ता आढळून आला.
हा रस्ता संशोधकांना हवाई आयलॅंडच्या उत्तरेला दिसला. समुद्राच्या तळात सुरू असलेल्या एका शोध अभियानादरम्यान संशोधकांना एक विटांचा बनलेला पिवळ्या रंगाचा रस्ता आढळून आला. हा रस्ता पाहून संशोधक हैराण झाले. त्यांना यावर विश्वासच बसत नव्हता की, समुद्राच्या तळाशी त्यांना एक रस्ता दिसेल.
दरम्यान पिवळ्या रंगाच्या विटांपासून बनलेला हा रस्ता मुळात रस्ता नाहीच आहे. हा एक प्राचीन तलाव होता जो कोरडा पडला होता. संशोधकांना हा रस्ता एक्सप्लोरेशन वेसल नॉटिलसमधून दिसला होता. सध्या Papahānaumokuākea Marine National Monument (PMNM) मध्ये लिलिसुओकलानी रिज (Liliʻuokalani ridge) चं सर्वेक्षण केलं जात आहे.
काय आहे PMNM?
PMNM जगातल्या सर्वात मोठ्या समुद्री संरक्षण क्षेत्रापैकी एक आहे. याच्या आकाराबाबत सांगायचं तर हा इतका विशाल आहे की, जर अमेरिकेतील सर्व नॅशनल पार्कला एकत्र केलं तरी हे क्षेत्र जास्त मोठं असेल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आतापर्यंत याच्या समुद्र तळाचा केवळ ३ टक्के भागच शोधला गेला आहे.
ओशियन एक्सप्लोरेशन ट्रस्टचे रिसर्च करणारे येथील लाइव्ह फुटेज रोज पाठवतात. नुकताच त्यांनी यूटयूबवर एक व्हिडीओ पब्लिश केला. तेव्हा समुद्रात शोध घेत असताना त्यांनी हा पिवळ्या रंगाचा रस्ता दिसला.