जगात असे अनेक लोक असतात जे विनाकारण एखाद्या गोष्टीला घाबरतात. इतकंच काय काही लोक डिप्रेशनमध्येही जातात. अशा लोकांची मानसिक स्थिती अनेकदा जीव जाण्यापर्यंत जाते. अशीच एक घटना समोर आली आहे. रोममधील एक शहर बोतोसानीमध्ये एका व्यक्तीने आपल्या ओव्हरथिंकिंगमुळे एक मूर्खपणा केला. त्याला काही दिवसांपासून पोटदुखीची समस्या होत होती. पण त्याची समस्या इतकी वाढेल याचा त्याने विचारही केला नव्हता.
एक दिवस तो त्याच्या पत्नीला म्हणाला की, तो बॉयलरसाठी काही लाकडं आणण्यासाठी आउटहाऊसमध्ये जात आहे. पण काही वेळाने त्याच्या पत्नीला एक टेक्स्ट मेसेज आला. ज्यात लिहिलं होतं की, सॉरी आणि तू एक खूप चांगली पत्नी आहे. त्याच्या पत्नीच्या लक्षात आलं की, काहीतरी गडबड आहे ती धावत आऊटहाऊसकडे गेली. तिथे तिला दिसलं की, पतीच्या एका हातात एंगल ग्राइंडर आहे आणि दुसरा त्याने पूर्ण कापला आहे.
पत्नीने लगेच अॅम्बुलन्सला फोन केला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे प्लास्टिक सर्जरी टीमने त्याचा हात पुन्हा जोडला. आता त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. त्याला हाताची मुव्हमेंट पुन्हा आधीसारखी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या घटनेची चौकशी झाली तेव्हा नातेवाईकांनी सांगितलं की, काही दिवसांपासून त्याला पोटात दुखत होतं आणि त्याच्या लक्षणांबाबत त्याने गुगलवर वाचलं तेव्हा त्याला विश्वास बसला की, त्याला पोटाचा कॅन्सर आहे. तो डिप्रेशनमध्ये गेला. पण डॉक्टरांना भेटण्याबाबत त्याने जराही विचार केला. त्याने थेट आत्महत्येचा विचार केला. मीडिया रिपोर्टनुसार, रूग्ण आता ठीक होत आहे आणि कॅन्सरची टेस्ट केली जात आहे ज्यामुळे तो चिंतेत होता.