Rose Day 2024 :आज सात फेब्रुवारी म्हणजे आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. लोक आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी फुलांचा आधार घेतील. कुणी फूलं देऊन प्रपोज करतील तर कुणी पार्टनर चेहऱ्यावर हसू फुलवेल. पण तुम्ही कधी अशा गुलाबाबाबत ऐकलंय का ज्याची किंमत कोट्यावधी रूपये आहे. हे फूल फार क्वचित मिळतं. आश्चर्याची बाब म्हणजे सामान्य फुलं दोन दिवसात कोमेजतात, पण हे फूल 3 वर्ष कोमेजत नाही.
याला ज्यूलिएट रोज म्हटलं जातं. हे जगातील सगळ्यात महागडं गुलाबाचं फूल आहे. याची किंमत 90 कोटी रूपयांपर्यंत असते. अशात कुणालाही प्रश्न पडेल की, हे फूल इतकं महाग का असतं? चला जाणून घेऊ याचं कारण. ज्यूलिएट रोजबाबत जगात पहिल्यांदा माहिती मिळाली ती 2006 साली. फेमज रोज ब्रीडर डेविड ऑस्टिन यानी जगासमोर हे फूल आणलं. हे फूल अनेक फुलांसोबत मिळून उगवण्यात येतं.
पोलन नेशनच्या रिपोर्टनुसार, गुलाबाच्या या प्रकाराचं नाव apricot-hued hybrid ठेवण्यात आलं आहे. हे उगवण्यासाठी 15 वर्षाचा वेळ आणि 5 मिलियन डॉलर म्हणजे 34 कोटी रूपये खर्च आला. 2006 मध्ये डेविडने गुलाब साधारण 90 कोटीला विकला होता. आता याची किंमत 130 कोटी रूपये सांगितली जाते.
डेविड ऑस्टिनच्या वेबसाइटनुसार, ज्यूलिएट रोजचा सुगंध चहाच्या हलक्या सुगंधासारखा येतो. या गुलाबाबाबत वेबसाइटवर बरीच माहिती दिली आहे. त्यावर लिहिलं आहे की, हा गुलाब खरेदी करण्याआधी कुणीही शंभर वेळा विचार करेल.