शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

४ कोटींची कार खरेदी करण्यासाठी १ वर्ष वाट पाहिली, केवळ ६ तासांत झाला चेंदामेंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 11:28 AM

एका व्यक्तीने फरारी कार बुक केली होती. पण ही कार मिळण्यासाठी त्याला काही महिने वाट बघावी लागणार होती. तरी फरारी F8 Tributo खरेदी करण्यासाठी कित्येक महिने त्याने वाट पाहिली.

आपली स्वत:ची कार घेणं हा प्रत्येकासाठीच आनंदाचा क्षण असतो. अनेकजण आपली स्वत:ची कार घेण्यासाठी अनेकवर्षे वाट बघतात. कार आली की, त्या प्रवास करण्याचा आनंद काही औरच. मात्र, एका व्यक्तीसोबत फारच विचित्र घटना घडली आहे. कारची डिलिव्हरी झाल्यावर केवळ ६ तासांमध्ये त्याची कोट्यावधी रूपयांची कार चेंदामेंदा झाली. 

एका व्यक्तीने फरारी कार बुक केली होती. पण ही कार मिळण्यासाठी त्याला काही महिने वाट बघावी लागणार होती. तरी फरारी F8 Tributo खरेदी करण्यासाठी कित्येक महिने त्याने वाट पाहिली. मात्र, इतके महिने प्रतिक्षा केल्यावर मिळालेला आनंद केवळ ६ तासच टिकू शकला. ४३ वर्षीय व्यक्तीने ४ कोटी रूपयांची फरारी F8 Tributo घेतल्यावर काही वेळातच ठोकली. कारची हालत इतकी खराब आहे की, या इटालियन कारचा फ्रंट लूक पूर्णपणे खराब झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी चौकशीत सांगितलं की, फरारी एका काँक्रिट बॅरियरवर आदळली आणि मागचं चाक पूर्णपणे मागे गेल्याने कारने पलटी खाल्ली. नंतर गाडी एका छोट्या बसलाही धडकली, त्यामुळे आणखी नुकसान झालं. गाडीचं सस्पेंशन, फ्रंट क्वॉर्टर पॅनलही पूर्णपणे बेंड झालं आहे. सुदैवाने या अपघातात चालकाला फार दुखापत झालेली नाही, परंतु मागच्या सीटवर बसलेला व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, Ferrari F8 Tributo मध्ये ३.९ लिटर ट्विन टर्बो V8 इंजिन देण्यात आलं आहे, जे ७१० हॉर्सपॉवरचं आहे. यात ३.९ लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन मिळतं, जे ७३०PS पॉवर आणि ७७० Nm चा टॉर्क जेनरेट करतं. Ferrari F8 Tributo कार केवळ २.९ सेकंदात ० ते १०० किलोमीटर ताशी वेग धरु शकते आणि ७.८ सेकंदात ही २०० किलोमीटर ताशी वेगाने धावते. या कारचा टॉप-स्पीड ३४० किलोमीटर प्रति तास आहे. 

टॅग्स :AccidentअपघातcarकारFerrariफेरारी