रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या डुप्लिकेटच्या मागे लागले लोक, ओरडून ओरडून मागतोय मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:33 PM2022-02-26T18:33:05+5:302022-02-26T18:39:58+5:30
Putin Lookalike : पुतिनसारखाच तो दिसत असल्याने त्याची नेहमी चर्चा होत असते. आज हेच कारण त्याच्यासाठी अडचण ठरत आहे. या व्यक्तीला भीती आहे की, पुतिन समजून त्याला यूक्रेन आणि अॅंटी वॉर प्रोटेस्टर जीवे मारू शकतात.
(Image Credit : mirrorimages.co)
Russia-Ukraine Crisis : चूक दुसराच करणार आणि त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागली तर कुणालाही राग येईल. अशाच स्थितीतून एक व्यक्ती सध्या जात आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून ही व्यक्ती जीव मुठीत घेऊन जगतो आहे. तो स्वत:च्या जीवासाठी भीक मागत आहे. ही व्यक्ती आहे ब्लादिमीर पुतिन यांचा डुप्लिकेट (Putin Lookalike). पुतिनसारखाच तो दिसत असल्याने त्याची नेहमी चर्चा होत असते. आज हेच कारण त्याच्यासाठी अडचण ठरत आहे. या व्यक्तीला भीती आहे की, पुतिन समजून त्याला यूक्रेन आणि अॅंटी वॉर प्रोटेस्टर जीवे मारू शकतात.
जगातला एकुलता एक प्रोफेशनल पुतिन यांचा डुप्लिकेट जीवाच्या सुरक्षेसाठी मदत मागत आहे. त्याने सांगितलं की, जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हा त्याला भीती आहे की, कधीही त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. पोलॅंडच्या व्रोक्लॉवमध्ये राहणारा ५३ वर्षीय स्लाविक सोबला म्हणाला की, पुतिनच्या या स्पेशल मिलट्री ऑपरेशनची शिक्षा त्याला भोगावी लागू शकते. ज्या ठिकाणी स्लाविक राहतो तिथे प्रत्येक १० पैकी एक नागरिक यूक्रेनचा आहे. अशात त्याचा जीव धोक्यात आहे. लोकांच्या मनातील राग त्याच्या जीवावर बेतू शकतो.
'डेली स्टार'सोबत बोलताना स्लाविकने सांगितलं की, युद्धाआधी त्याला रस्त्याने फिरण्यात अजिबात भीती वाटत नव्हती. पण आता त्याला बाहेर फिरण्याची भीती वाटते. त्याला वाटतं की, त्याच्यावर अचानक कुठेही हल्ला होऊ शकतो. अनेक लोक त्याला आधीही म्हणत होते की, तू पुतिनसारखा दिसतो. आधी तो त्याच्या दिसण्याला ओळख मानत होता. पण आता हीच ओळख त्याच्यासाठी धोका बनली आहे. स्लाविकच्या पत्नीने सांगितलं की, स्लाविक पुतिनचा अभिनय पैशांसाठी नाही तर केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी करत होता.
स्लाविकला यूकेमधील Lookalikes Agency रिप्रेझेंट करते. ही एजन्सीच स्लाविकचे सगळे शो स्पॉन्सर करते. गेल्या आठ वर्षापासून पुतिनचा डुप्लिकेट म्हणून काम करत आहे. यातून त्याला पैसे मिळतात. पण हा कमाईचा मुख्य मार्ग नाही. स्लाविकचा एक ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. तर पुतिन बनून तो एक्स्ट्रा पैसे कमावतो. पण रशियाने यूक्रेनवर हल्ला केला तर त्याचा पुतिनकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. आता त्याला पुतिनचा डुप्लिकेट म्हणून काम करायचं नाहीये. त्याने जीवाला धोका असल्याने सुरक्षेची मागणी केली आहे.