शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

लॉकडाऊनमध्ये प्रेम, युद्धात लग्न! भारतीय तरुणाशी सात फेरे घेण्यासाठी युक्रेनमधून पळून आली 'ती' अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 3:28 PM

युक्रेनमधील एक तरुणी भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि आता ते दोघं लग्नही करणार असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं देखील म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. युक्रेनमधील एक तरुणी भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि आता ते दोघं लग्नही करणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतात राहणारा 33 वर्षीय अनुभव भसीन, हा व्यवसायाने दिल्ली उच्च न्यायालयात वकील आहे, त्याची 29 वर्षीय युक्रेनची गर्लफ्रेंड एन्ना होरोदेत्स्का ही प्रेमापोटी कीव येथून आता भारतात आली आहे. भयावह वातावरणातून ती भारतात पोहोचताच अनुभवने तिला लग्नासाठी विचारलं आहे.

अडीच वर्षांपूर्वीच्या एका प्रवासादरम्यान या दोघांची ओळख झाली. पण 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे जग बंद असताना त्यांच्यातील नातं खऱ्या अर्थाने फुललं. अनुभव आणि एन्ना भारतात एकत्र प्रवास करत होते. एन्ना एका आयटी कंपनीत काम करत होती आणि घरी मेकअपचे कामही करायची. पण लॉकडाऊनमुळे उड्डाणे रद्द झाल्यावर एन्ना भारतात अडकली. त्यामुळे तोपर्यंत ती अनुभवच्याच घरीच राहिली. यादरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एन्नाने अनुभवच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती युक्रेनला परतली.

सर्व काही नीट, सुरळीत सुरू होतं परंतु 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनशी युद्ध पुकारलं आणि तेव्हा सर्वच बदललं. एन्नाच्या घराबाहेर सातत्याने बॉम्बस्फोट होत होते. भयंकर परिस्थिती होती. त्यानंतर तिने 27 तारखेला पोलंडला जायचे ठरवले. म्हणून तिने काही उबदार कपडे आणि आवश्यक गोष्टी पॅक केल्या, स्टेशनवर पोहोचण्यासाठी कॅब शोधली, जिथे तिने तिच्या आईला सोडलं. त्यानंतर लिविवला जाण्यासाठी एन्नानी दोन तास ट्रेनची वाट पाहिली. हे ठिकाण युक्रेनच्या पश्चिमेला आणि पोलिश सीमेजवळ आहे.

28 रोजी तिने पोलंडहून बस घेण्याचे ठरवले, परंतु येथे तिला कळलं की लोक पोलंडची सीमा ओलांडण्यासाठी 24 तासांपेक्षा जास्त काळ वाट पाहत आहेत. आपला निर्णय बदलून तिने स्लोवाकियाला जाण्याचे ठरवले. अशा प्रकारे ती मध्यरात्री सीमेवर पोहोचली, तिथे थोडा वेळ थांबून ती पायीच सीमा ओलांडली. स्लोवाकियामध्ये प्रवेश करताच ती मिनीबसने पोलंडमधील क्राकोव येथे पोहोचली. तिथे काही मित्र होते त्यांनी खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था केली. अखेर एन्नानी पोलंडमध्ये भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला आणि व्हिसा मिळताच तिने लगेचच भारत गाठलं. जिथे अनुभव तिची आतुरतेने वाट पाहत होता. यानंतर आता लवकरच ते दोघं लग्न करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतmarriageलग्न