Russia Ukraine War: कोण आहे ‘ही’ परदेशी गर्ल?; दिल्लीत येताच भारतीय युवकानं केले प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 07:23 PM2022-03-27T19:23:02+5:302022-03-27T19:23:31+5:30

अनुभव भसीननं यूक्रेन सोडून दिल्लीत आलेल्या एनाला दिल्लीच्या एअरपोर्टवर उतरताच प्रपोज केले

Russia Ukraine War: Ukrainian Girl Anna Horodetska To Marry Delhi Boy Anubhav Bhasin | Russia Ukraine War: कोण आहे ‘ही’ परदेशी गर्ल?; दिल्लीत येताच भारतीय युवकानं केले प्रपोज

Russia Ukraine War: कोण आहे ‘ही’ परदेशी गर्ल?; दिल्लीत येताच भारतीय युवकानं केले प्रपोज

googlenewsNext

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्धाला महिना उलटत आला तरी अद्याप हे युद्ध संपलं नाही. यात काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. असाच एक फोटो अनुभव भसीन आणि यूक्रेनच्या एना होरोदेत्सकाचा व्हायरल होता. अनुभव भसीन हा भारतातील असून सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमकहाणीचा किस्सा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यूक्रेनी गर्ल भारतात पोहचताच तिला अनुभवनं प्रपोज केले. लवकरच हे दोघं विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत.

अनुभव भसीननं यूक्रेन सोडून दिल्लीत आलेल्या एनाला दिल्लीच्या एअरपोर्टवर उतरताच प्रपोज केले. त्यानंतर एनानेही अनुभवच्या प्रेमाचा स्वीकार केला. व्यवसायाने वकील असलेल्या अनुभवनं मागील २ वर्षापासून एनाला डेट केले आहे. पहिल्यांदा एना आणि अनुभव यांची भेट २०२० मध्ये झाली. जेव्हा एना कोविड काळात  भारत दौऱ्यावर आली होती.

कोण आहे एना?

एना होरोदेत्स्काने सांगितले की, ती तिच्या आईसोबत सेंट्रल यूक्रेनमध्ये राहते. तिच्या आईने एका मॅक्सिकन व्यक्तीशी लग्न केले आहे. एना आयटी कंपनीत काम करत होती. कोरोना काळात लॉकडाऊन लागल्यामुळे तिला खूप काळ भारतात राहावं लागलं. त्यावेळी एना आणि अनुभव पहिल्यांदा भेटले. यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली एना अनेकदा भारतात आली तेव्हा ती अनुभवला भेटत होती. सध्या यूक्रेन-रशिया युद्ध सुरू असल्याने एना हे युद्ध संपण्याची वाट पाहतेय. अनुभव एनाने २७ एप्रिलला लग्न करण्याचं ठरवलं आहे.

भारतात कशी पोहचली?

यूक्रेनहून दिल्लीपर्यंतचा प्रवास सांगताना एनाने तिचा अनुभव शेअर केला. यूक्रेन ते भारत हा प्रवास कठीण होता. एकीकडे युद्ध भडकल्यामुळे त्यातून बचाव करत, धोक्यांचा सामना करत एना दिल्लीपर्यंत पोहचली आहे. पोलंडमार्गे ती भारतात आली. एनाने अनुभवचं कुटुंब प्रेमळ आणि मदत करणारे आहे असं म्हटलं. तर एका न्यूज एजन्सीला अनुभव भसीनं सांगितले की, आम्ही २ वर्षापासून डेटिंग करत होतो. मार्चमध्ये लग्न करण्याचं ठरवलं परंतु युद्धामुळे ते होऊ शकलं नाही. एना तिच्या आईसोबत ३ दिवस बंकरमध्ये होती. त्यानंतर तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिला २ आठवडे पोलंडमध्ये राहावं लागले. त्यानंतर भारताचा व्हिसा तिला मिळाला आणि ती दिल्लीत पोहचली.

Web Title: Russia Ukraine War: Ukrainian Girl Anna Horodetska To Marry Delhi Boy Anubhav Bhasin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.