जगभरातून प्रेमाच्या आणि लग्नांच्या अजब अजब घटना समोर येत असतात. यातील काही कौतुकास्पद तर काही हैराण करणाऱ्या असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एक महिलेचं आपल्याच मुलासोबत अफेअर होतं नंतर त्यांनी लग्नही केलं. याच कारणाने महिलेला भटकावं लागत आहे. आपल्या 31 वर्षीय मुलासोबत लग्न करणाऱ्या महिलेने सांगितलं की, कशाप्रकारे आपल्या इतर पाच मुलांना सोबत ठेवण्यासाठी ती मॉस्कोत जात आहे.
ही घटना रशियातील आहे. इथे 53 वर्षीय संगीतकार ऐसीलु चिजेव्स्काया मिंगालिमने बाल कल्याण विभागाला तेव्हा हैराण जेव्हा तिने आपल्या 22 वर्षीय दत्तक घेतलेल्या मुलासोबत लग्न केलं.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मिंगालिमने मुलगा डेनिअलचा सांभाळ तो 14 वर्षाचा असतानापासून केला होता. महिलेने त्याला एका अनाथालयातून दत्तक घेतलं होतं. असं सांगण्यात आलं की, मिंगालिम इथेच डेनिअलला म्युझिक शिकवत होती. त्यावेळी त्याचं वय 13 होतं.
पण डेनिअलसोबत लग्न केल्यापासून मिंगालिम अडचणीत सापडली. स्थानिक बाल कल्याण अधिकाऱ्यांनी मिंगालिमच्या इतर दत्तक घेतलेल्या पाच मुलांना जप्त केलं. ज्यात चार मुली आणि एक मुलगा आहे. अधिकाऱ्यांचं मत आहे की, मिंगालिम इतर मुलांचा व्यवस्थित सांभाळ करू शकणार नाही.
स्थानिक मीडियासोबत बोलताना मिंगालिमने सांगितलं की, डेनिअलसोबत तिचं अफेअर त्याला घरी आणल्यापासून सुरू झालं होतं. मिंगालिम म्हणाली की, 'आमचं नातं योग्य आहे. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत'.
स्थानिक मीडियाने सांगितलं की, तातारस्तान टीव्ही स्टेशनच्या एका फिल्म प्रोजेक्ट दरम्यान अनाथ मुलांना भेटल्यावर मिंगालिमने मुलं दत्तक घेणं सुरू केलं होतं. सध्या मिंगालिम तातारस्तानमधून पळून जाण्याचा विचार करत आहे आणि तिला आपल्या पतीलाही सोबत घेऊन जायचं आहे. तिला प्लान मॉस्कोमध्ये जाण्याचा आहे. जेणेकरून ती तिथे आपला पती आणि इतर मुलांसोबत राहू शकेल.