रशियाची माजी गुप्तहेर जी गुन्हेगाराच्या पडली होती प्रेमात, यूक्रेनवरून पुतिन यांच्यावर करत आहे टिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 01:00 PM2022-03-12T13:00:00+5:302022-03-12T13:02:57+5:30
Aliia Roza : आलियाने आपल्याच देशाच्या कारवाई विरोधात बोलताना अनेक खुलासे केले. चला जाणून घेऊ कोण आहे ही माजी रशियन महिला गुप्तहेर आलिया रोजा...
यूक्रेनसोबत (Russia-Ukraine War) युद्ध सुरू असतानाच रशियाच्या एका माजी महिला गुप्तहेराने राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्यावर टिका केली आहे. माजी गुप्तहेर महिला आलिया रोजा(Aliia Roza) म्हणाली की, यूक्रेनबाबत आता पुतिन मागे हटणार नाहीत. ते शेवटापर्यंत जातील. आलिया म्हणाली की, पुतिन यांना कदाचित अंदाज नव्हता की, यूक्रेनियन अशाप्रकारे लढतील आणि जगभरातून समर्थन मिळवतील. आलियाने आपल्याच देशाच्या कारवाई विरोधात बोलताना अनेक खुलासे केले. चला जाणून घेऊ कोण आहे ही माजी रशियन महिला गुप्तहेर आलिया रोजा...
'द सन' च्या रिपोर्टनुसार, ३७ वर्षीय आलिया फार कमी वयात रशियन सेनेत गुप्तहेर म्हणून सहभागी झाली होती. तिचे वडील सेनेत मोठे अधिकारी होते. आलिया रोजा देण्यात आलेल्या टार्गेटकडून माहिती मिळवण्याचं काम मिळालं होतं. आलियानुसार, 'तिथे आम्हाला शिकवलं जात होतं की, कशाप्रकारे पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढायचं, कशाप्रकारे त्यांना मानसिक रूपाने प्रभावित करायचं, कशाप्रकारे त्यांच्याशी बोलायचं जेणेकरून माहिती काढता यावी आणि पोलिसांकडे सोपवता यावी'. एकाप्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकवून सीक्रेट माहिती मिळवण्याचं काम होतं.
रिपोर्टनुसार, सगळंकाही ठीक सुरू होतं पण एक दिवस आलिया रोजा अशा व्यक्तीच्या प्रेमात पडली ज्याच्यावर तिला लक्ष ठेवण्याचं काम देण्यात आलं होतं. या घटनेमुळे तिची पोलखोल झाली. २००४ मध्ये झालेल्या घटनेबाबत सांगताना आलिया म्हणाली की, त्या व्यक्तीचं नवा ब्लादिमीर होतं. नंतर त्यानेच आलियाचा जीव ड्रग्स डीलर्स गॅंगपासून वाचवला होता.
आलियाने सांगितलं की, गुप्तहेरी करतेवेळी ड्रग डीलर्स गॅंगने मला पकडलं होतं आणि नंतर जबरदस्ती मला एका जंगलात घेऊन गेले होते. तिथे साधारण १० लोकांना मला मारहाण केली. पण ब्लादिमीरने मला वाचवलं. नंतर त्याची हत्या करण्यात आली.
ब्लादिमीरने सांगितलं की, आलिया रोजाने २००६ मध्ये एका श्रीमंत रशियन व्यक्तीसोबत लग्न केलं. नंतर त्यालाही काही कारणाने तुरूंगात जावं लागलं आणि मग तुरूंगातच त्याचा मृत्यू झाला. नंतर आलियाने पतीच्या पैशांच्या मदतीने एकुलत्या एका मुलाला सोबत घेऊन देश सोडला. ती पुन्हा कधी परत आली नाही. ३७ वर्षीय रोजा आता लंडन, कॅलिफोर्निया आणि मिलानमध्य एका फॅशन पीआर म्हणून काम करते.
ती यूक्रेनबाबत 'डेली स्टार'ला म्हणाली की, पुतिन हे युद्ध हरू शकत नाही आणि परतही येऊ शकत नाही. कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. ते त्यांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. दरम्यान आलिया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिचे इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स आहेत.