शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

रशियाची माजी गुप्तहेर जी गुन्हेगाराच्या पडली होती प्रेमात, यूक्रेनवरून पुतिन यांच्यावर करत आहे टिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 1:00 PM

Aliia Roza : आलियाने आपल्याच देशाच्या कारवाई विरोधात बोलताना अनेक खुलासे केले. चला जाणून घेऊ कोण आहे ही माजी रशियन महिला गुप्तहेर आलिया रोजा...

यूक्रेनसोबत (Russia-Ukraine War) युद्ध सुरू असतानाच रशियाच्या एका माजी महिला गुप्तहेराने राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्यावर टिका केली आहे. माजी गुप्तहेर महिला आलिया रोजा(Aliia Roza) म्हणाली की, यूक्रेनबाबत आता पुतिन मागे हटणार नाहीत. ते शेवटापर्यंत जातील. आलिया म्हणाली की, पुतिन यांना कदाचित अंदाज नव्हता की, यूक्रेनियन अशाप्रकारे लढतील आणि जगभरातून समर्थन मिळवतील. आलियाने आपल्याच देशाच्या कारवाई विरोधात बोलताना अनेक खुलासे केले. चला जाणून घेऊ कोण आहे ही माजी रशियन महिला गुप्तहेर आलिया रोजा...

'द सन' च्या रिपोर्टनुसार, ३७ वर्षीय आलिया फार कमी वयात रशियन सेनेत गुप्तहेर म्हणून सहभागी झाली होती. तिचे वडील सेनेत मोठे अधिकारी होते. आलिया रोजा देण्यात आलेल्या टार्गेटकडून माहिती मिळवण्याचं काम मिळालं होतं. आलियानुसार, 'तिथे आम्हाला शिकवलं जात होतं की, कशाप्रकारे पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढायचं, कशाप्रकारे त्यांना मानसिक रूपाने प्रभावित करायचं, कशाप्रकारे त्यांच्याशी बोलायचं जेणेकरून माहिती काढता यावी आणि पोलिसांकडे सोपवता यावी'. एकाप्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकवून सीक्रेट माहिती मिळवण्याचं काम होतं.

रिपोर्टनुसार, सगळंकाही ठीक सुरू होतं पण एक दिवस आलिया रोजा अशा व्यक्तीच्या प्रेमात पडली ज्याच्यावर तिला लक्ष ठेवण्याचं काम देण्यात आलं होतं. या घटनेमुळे तिची पोलखोल झाली. २००४ मध्ये झालेल्या घटनेबाबत सांगताना आलिया म्हणाली की, त्या व्यक्तीचं नवा ब्लादिमीर होतं. नंतर त्यानेच आलियाचा जीव ड्रग्स डीलर्स गॅंगपासून वाचवला होता.

आलियाने सांगितलं की, गुप्तहेरी करतेवेळी ड्रग डीलर्स गॅंगने मला पकडलं होतं आणि नंतर जबरदस्ती मला एका जंगलात घेऊन गेले होते. तिथे साधारण १० लोकांना मला मारहाण केली. पण ब्लादिमीरने मला वाचवलं. नंतर त्याची हत्या करण्यात आली. 

ब्लादिमीरने सांगितलं की, आलिया रोजाने २००६ मध्ये एका श्रीमंत रशियन व्यक्तीसोबत लग्न केलं. नंतर त्यालाही काही कारणाने तुरूंगात जावं लागलं आणि मग तुरूंगातच त्याचा मृत्यू झाला. नंतर आलियाने पतीच्या पैशांच्या मदतीने एकुलत्या एका मुलाला सोबत घेऊन देश सोडला. ती पुन्हा कधी परत आली नाही. ३७ वर्षीय रोजा आता लंडन, कॅलिफोर्निया आणि मिलानमध्य एका फॅशन पीआर म्हणून काम करते.

ती यूक्रेनबाबत 'डेली स्टार'ला म्हणाली की, पुतिन हे युद्ध हरू शकत नाही आणि परतही येऊ शकत नाही. कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. ते त्यांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. दरम्यान आलिया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिचे इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स आहेत.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स