Sadio Mane’s broken Mobile: पश्चिम आफ्रिकन देश सेनेगलचा स्टार फुटबॉलपटू सॅडियो मानेचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो अडीच वर्षे जुना आहे, पण आजही फोटो पाहून नेटकरी चकीत होतात. कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या खेळाडूच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.
अडीच वर्षांपूर्वी हा फोटो समोर आला, तेव्हाही सादियो मानेला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने दिलेल्या उत्तराने अनेकांचे डोळे पानावले होते. तुम्ही याचे कारण ऐकले तर तुम्हीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. मूळात सादियो माने फोनपेक्षा आपल्या देशातील गरिबांकडे जास्त लक्ष देतो. एका मुलाखतीत सदियो माने तुटलेल्या मोबाईलबद्दल म्हणाला होता, 'मी असे हजार मोबाईल घेऊ शकतो. पण, मला याची गरज वाटत नाही. मी गरिबी पाहिली आहे, मला शाळेत जाता आले नाही. यामुळेच मी इतर वस्तुंवर पैसे खर्च करण्यापेक्षा माझ्या देशातील मुलांसाठी शाळा आणि फुटबॉल स्टेडियम बांधले आहेत.
साडिओ लिव्हरपूलचा महत्त्वाचा खेळाडू इंग्लिश क्लब लिव्हरपूलसाठी सॅडिओ माने हा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने क्लबसाठी 269 सामन्यात 120 गोल केले. सॅडिओ मानेच्या नेतृत्वाखाली इंग्लिश क्लब लिव्हरपूलने 2018-19 मध्ये चॅम्पियन्स लीग आणि 2019-20 मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले. साडिओने या वर्षी जर्मन क्लब बायर्न म्युनिचसोबत सुमारे 330 कोटी रुपयांचा (40 दशलक्ष युरो) तीन वर्षांचा करार केला आहे.