संभल - उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील शैक्षणिक कौशल्याने समृद्ध गाव औरंगपूर सिलाटा येथे काहीच घरे अशी असतील ज्यातील कुणी सदस्य अधिकारी नसेल. या गावातून आतापर्यंत ३१ जण IPS आणि पीसीएस अधिकारी झाले आहेत. या गावात शिक्षण सुरू करणाऱ्या प्रत्येक तरुणाचं पहिलं स्वप्न अधिकारी बनण्याचं असतं. अग्निपथ योजनेला पाठिंबा देणाऱ्या या गावातील तरुणही देशसेवेसाठी मेहनत घेत आहेत. त्याचवेळी, स्वातंत्र्यापूर्वी या गावातील हरवखसिंग हे पीपीएस अधिकारी झाले. जे आता निवृत्त होऊन येथील तरुणांना अधिकारी होण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.
औरंगपूर सिलाटा हे गाव सुमारे तीन हजार लोकसंख्या आहे. या गावात ठाकूर, पाल, जाटव, सैनी बिरादरी सोबतच मुस्लीम समाजाचे लोक राहतात. या गावातील बहुतांश लोक सुशिक्षित आहेत. स्वातंत्र्यापूर्वी या गावातील रहिवासी हरवखसिंग हे पीसीएस अधिकारी झाले. तेव्हापासून आजपर्यंत या गावातून ३१ आयपीएस आणि पीसीएस अधिकारी झाले आहेत. क्वचितच असे कोणते घर असेल ज्याचे सदस्य सरकारी नोकरीत नसतील.
सध्या १५ जण करतायेत IPS-PCS ची तयारीअधिकारी वगळता या गावातील ३० हून अधिक लोक इतर पदांवरही नियुक्त आहेत. स्वातंत्र्यानंतर, सुलतान सिंह कृषी विभागात संचालक म्हणून नियुक्त झाले, तर त्यांचे भाऊ आयदल सिंह वन विभागात रेंजर झाले. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी तरुणांना अधिकारी होण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी अंशू राघव पीपीएस अधिकारी झाली होती. सध्या १५ हून अधिक तरुण आयपीएस आणि पीसीएस अधिकारी होण्याच्या तयारी करत आहेत.
गावात १२ शैक्षणिक संस्थातीन हजार लोकसंख्या असूनही १२ शैक्षणिक संस्था आहेत यावरून गावात शिक्षणाचा स्तर किती उंचावलेला आहे याचा अंदाज लावता येतो. यात एक इंटर कॉलेज, दोन कनिष्ठ माध्यमिक शाळा आणि दोन प्राथमिक शाळा आहेत. यासोबतच गावात मदरसाही आहे.