मोगादीशू : सोमालिया नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. आताही चर्चेत आहे, पण यंदा कारण काहीसे वेगळे आहे. सोमालियातील इस्लामिक समूहाने सामोसा खाण्यास बंदी आणली आहे. सामोशाचा आकार त्रिकोणी असून, तो खिश्चन समुदायाशी जवळीक सांगतो, असा यावर आक्षेप आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या खाद्य कार्यक्रम विभागाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे आठ लाख मुलांवर उपासमारीचे संकट ओढावू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पूर्व आफ्रिकन देशात हा सामोसा वर्षानुवर्षांपासून आहारात समाविष्ट आहे. या सामोशात प्रामुख्याने भाज्या, मांस यांचा उपयोग केला जातो. अल शबाब या संघटनेच्या नेत्यांनी सामोशावर आक्षेप घेतला आहे. दुष्काळ पीडित सोमालिया अगोदरच अनेक संकटांना सामोरे जात आहे. त्यात आता सामोशावरील बंदीमुळे नवे संकट उभा ठाकले आहे.
सोमालियात सामोसा? नको रे बाबा!
By admin | Published: January 10, 2017 1:10 AM