ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 01 - मोबाईल मार्केटिंगमध्ये अग्रेसर असलेल्या सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी एस- 8 स्मार्टफोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर नव्या फिचर्ससह आणखी एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीकडून "सॅमसंग गॅलेक्सी एस 8 प्लस" हा नवीन स्मार्टफोन गुरुवारी भारतात लॉन्च करण्यात आला.
6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या ह्या स्मार्टफोनची किंमत 74 हजार 990 रुपये असून येत्या 9 जूनपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तर, सॅमसंग शॉप आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंगसाईटवर 2 जूनपासून हा स्मार्टफोन प्री-बुक करता येणार आहे.
"सॅमसंग गॅलेक्सी एस 8 प्लस" हा एक वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम डिव्हाईस आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी असून नवीन फीचर्स आहेत. गेमसाठी हा स्मार्टफोन शीर्षस्थानी आहे, असे कंपनीचे भारतातील वरिष्ठ उपाध्यक्ष असिम वारसी यांनी सांगितले.
काय आहे "सॅमसंग गॅलेक्सी एस 8 प्लस" मध्ये...
- 6.2 इंचाचा डिस्प्ले.
- 6 जीबी रॅम
- 128 जीबी इंटरनल मेमरी .
- 1.9 गिगाहर्टझ ऑक्टाकोर प्रोसेसर.
- 12 मेगापिक्सल रेयर कॅमेरा.
- 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा.
- अँड्रॉईड 7.0 Nougat.
- वायफाय, एनएफसी, ब्लूटूथ.
- 3,500 mAh बॅटरी.
- किंमत -74,990 रुपये.