दुबईची राजकुमारी लतीफा मक्तूम गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या राजकुमारीचा एका व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बीबीसी पेनोरेमानं लतीफाचे काही व्हिडीओ मॅसेज शेअर केले आहेत. राजकुमारी लतीफानं आलिशान विला जेलच्या बाथरूमध्ये बसून व्हिडीओ शूट केला आहे.
३५ वर्षीय लतीफा म्हणते की, ''मला कैद करून ठेवण्यात आलं आहे. सगळ्या खिडक्या बंद असून मी उघडूसुद्धा शकत नाही. ताजी हवा खाण्यासाठी मी बाहेरही जाऊ शकत नाही. मला माझ्या सुरक्षेची आणि आयुष्याची चिंता नेहमी असते. मी जीवंत वाचेन की नाही याची मला कल्पना नाही. संपूर्ण आयुष्य मला जेलमध्ये राहावे लागेल. अशी धमकी पोलिसांनी दिली असून मला इथून माझी सुटका करायची आहे. ''
"Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्...
रिपोर्टनुसार, प्रिसेंस लतीफा विला जेलमध्ये जवळपास ३० पोलिसांच्या सुरक्षेत आहे. लतीफाची मैत्रिण टीनाने बीबीसीशी बोलताना सांगितले की, ''ती खूप जास्त पिवळी पडली आहे. किती महिन्यांपासून तिनं सुर्यप्रकाश पाहिलेला सुद्धा नाही. ती फक्त आपली खोली आणि किचनपर्यंत जाऊ शकते'' दरम्यान २०१८ मध्ये लतीफानं देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी ती आपल्या फ्रान्सच्या मित्रासह गोव्याच्या समुद्राजवळ बेपत्ता झाली होती.
आपल्याला किडनॅप करण्यात आलं आहे. अशी माहिती तिनं मेसेजच्या माध्यमातून दिली होती. यानंतर भारतीय सेनेला एक अज्ञात जहाज मिळालं होतं त्यात लतीफाला बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर लतीफाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली होती. नंतर कळलं की तिनं स्वतःहून देश सोडला आणि इतर देशांमध्ये शरणार्थी म्हणून राहणार होती.