पॅराग्लायडिंग(Paragliding) अनेक लोकांसाठी स्वप्न सत्यात उतरण्यासारखं असतं. अनेकजण एड्रेलाइन रश पाठलाग करतात. हा साहसी खेळ आहे. परंतु चिलीत एका व्यक्तीसाठी पॅराग्लायडिंग करणं एका वाईट स्वप्नासारखं अनुभव देणारा ठरला. कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्य पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. जेव्हा एका पॅराग्लायडरशी निगडीत २ लोकांची मदत करण्याच्या नादात ग्राऊंड वर्करला हवेत ढकलण्याच्या नादात आकाशात लटकला. ही घटना सोमवारी सेंट्रल चिलीच्या कॉर्डिलेरा प्रांतात घडली आहे.
प्रशिक्षकाच्या संरक्षणाशिवाय कामगार हवेत लटकला
या घटनेच्या व्हिडिओमध्ये एक प्रशिक्षक आणि विद्यार्थी पॅराग्लायडिंग विमानाला बांधलेले दिसत आहेत. त्याने हेल्मेटसह सर्व योग्य गिअर घातले आहेत. एक ग्राउंड वर्कर ज्याने कोणतेही संरक्षणात्मक गिअर घातलेले नाही आणि हार्नेसमध्ये बांधलेले नाही. तो पॅराग्लायडरला वाऱ्याच्या वेगासोबत उचलण्यास मदत करतो. पॅराग्लायडर टेक ऑफ होताना, कामगार हार्नेसच्या खालच्या भागावर लटकतो आणि हवेच्या झोक्यासोबत पॅराग्लायडर उंचावर जात आहे.
हवेत लटकणारा व्यक्ती डोंगरावर पडला
पायलट ग्राउंड वर्करला हार्नेसवर लटकलेला पाहतो आणि पटकन मदत करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळाने, पॅराग्लायडर कामगाराला खालच्या टेकडीवर घेऊन जातो जेणेकरून तो सुरक्षितपणे खाली पडू शकेल. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ३० सेकंदाच्या व्हिडिओने अनेकांना आश्चर्यचकित केले
या भीषण घटनेतून व्यक्ती थोडक्यात बचावला
कामगार खाली पडल्यानंतर पॅराग्लायडर हवेतून ओरडत राहिला, पण त्याला परत कोणताही आवाज आला नाही. मात्र, नंतर ग्राउंड वर्करची सुटका करण्यात आली. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि त्यांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच डीटीएसीने याप्रकरणी तपास सुरू केला असून पॅराग्लायडिंग कंपनीकडून अहवाल मागवण्यात आला आहे.