भारतात अशी अनेक गावे आहेत जिथे काही उत्कृष्ट काम केले जात आहे. यापैकी एक गाव जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आहे, जिथे लोक प्लास्टिकमुक्त पृथ्वीचे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हे गाव चर्चेचा विषय राहिले आहे. येथे तुम्हाला 20 क्विंटल प्लास्टिक कचरा देण्यासाठी एक सोन्याचं नाणं मिळतं. हे गाव सध्या प्लास्टिकमुक्त आहे.
हे गाव सध्याच्या दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आहे. सादिवरा असं या गावाचं नाव आहे. येथील सरपंचांनी गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा मोठा उपक्रम सुरू केला. गावचे सरपंच फारुख अहमद गनई यांना गाव प्लास्टिकमुक्त करायचं आहे. व्यवसायाने वकील असलेल्या गनई यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र फारसे यश मिळाले नाही. पण त्यांनी अशी घोषणा केल्याने लोकांची गर्दी झाली. ही गोष्ट जाहीर होताच कचरा कमी होऊ लागला.
सरपंचांनी 'प्लास्टिक दो और सोना लो' ही मोहीम सुरू केल्याचं सांगण्यात येतं. या योजनेंतर्गत कोणी 20 क्विंटल प्लास्टिक कचरा दिल्यास पंचायत त्याला सोन्याचे नाणे देईल. मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे पाहून जवळपासच्या इतर अनेक पंचायतींनीही त्याचा अवलंब केल्याचे अनेक रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे या गावचे सरपंच सांगतात की, मी माझ्या गावात बक्षिसाच्या बदल्यात पॉलिथिन देण्याची घोषणा केली, जी यशस्वी झाली. नद्या-नाले स्वच्छ करण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. इतर काही गावांची चर्चा इतर मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आली आहे, जिथे प्लास्टिक कचरा दूर करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करण्यात आला आहे. यापैकी एक मार्ग म्हणजे सोने देणे. त्यात बऱ्यापैकी यशही आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.