गृहपाठ केला नसताना वही विसरलो असं कारण अनेकांनी शाळेत शिक्षकांना दिलं आहे. गृहपाठ केला होता, पण वही आणायला विसरलो, असा बहाणा करून अनेकांनी शाळेत मार वाचावला. पण ऑनलाईन शाळा सुरू असताना विसरल्याचं कारण देता येत नाही. त्यामुळे आता विद्यार्थी अनेक वेगवेगळी कारणं देत आहेत. सोशल मीडियावर याचे अनेक किस्से पाहायला मिळत आहेत.शारीरिक संबंध ठेवताना व्यक्तीचा मृत्यू; परमोच्च आनंद मिळणं ठरलं जीवघेणंशिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नये, गृहपाठाबद्दल विचारणा होऊ नये यासाठी एका विद्यार्थ्यानं भन्नाट शक्कल लढवली. विद्यार्थ्यानं केलेली चलाखी समजायला शिक्षिकेला काही आठवडे लागले. शिक्षकेच्या पतीनं हा किस्सा ट्विटरवर शेअर केला आहे. 'माझी पत्नी शिक्षिका आहे. ती झूमवर वर्ग घेत असताना एक विद्यार्थी स्वत:चं नाव बदलून Reconnecting असं ठेवत होता. कित्येक आठवड्यांपासून तो अशाप्रकारे गृहपाठ, प्रश्न चुकवत होता,' असं ख्रिस अर्नॉल्ड यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.लाईन तोडून या कोट्याधीशाने अभिनेत्री पत्नीसोबत घेतली वॅक्सीन, नोकरी गेली अन् इज्जतही...स्वत:चं नाव बदलून तिथे Reconnecting लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षणाची फारशी चिंता करण्याची गरज नाही. तो आधीच खूप हुशार आहे, असं ख्रिस यांनी गमतीनं म्हटलं आहे. ख्रिस यांचं ट्विट व्हायरल झालं असून ते १ लाखाहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तर ११ हजारपेक्षा अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. ऑनलाईन क्लास सुरू असताना होणाऱ्या गमतीजमती, भन्नाट किस्से अनेकांनी शेअर केले आहेत.
झूम लेक्चरमध्ये स्वत:चं नाव Reconnecting ठेवलं; पोरानं मॅडमला कित्येक आठवडे गंडवलं
By कुणाल गवाणकर | Published: January 28, 2021 6:35 PM