अनेक पार्ट्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, काही लोक मद्यसेवन केल्यावर अचानक फाडफाड इंग्रजी बोलू लागतात. ते फुल कॉन्फिडन्समध्ये तेही खास टोनमध्ये इंग्रजी बोलू लागतात. ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत देणं पसंत करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? मुळात लोकांच्या या वागण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. एका रिसर्चमधून याचा उलगडा करण्यात आला आहे.
असं का होतं?
सायन्स मॅगझिन जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, मद्याचे १ किंवा दोन पेग घेतल्यानंतर लोकांचा नर्वसनेस दूर होतो. ते कॉन्फिडंट होऊन ती दुसरी भाषा बोलू लागतात, जी सामान्यपणे बोलण्यात ते अडखळतात किंवा सहज नसतात. भारतात तर अनेक लोक मद्यसेवन केल्यावर धडाधड इंग्रजी बोलू लागतात.
पर्सनॅलिटीमध्ये होतो बदल
या रिसर्चनुसार, मद्यसेवन केल्याने लोकांच्या स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर प्रभाव पडतो. यादरम्यान काही लोकांची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलून जाते. त्यांचा आत्मविश्वास बूस्ट होतो. असं होताच ते त्या गोष्टींवर फोकस करू लागतात ज्या गोष्टींवर ते शुद्धीत असताना फोकस करू शकत नाहीत.
कुणाला डान्स आवडतो तर कुणाला गाणं
दुसरी भाषा बोलण्यासोबतच लोक मद्यसेवन केल्यावर आणखीही काही गोष्टी करू लागतात. जे लोक सामान्य वेळी डान्स करण्यासाठी लाजतात ते मद्यसेवन केल्यावर डिस्को डान्सर बनून डान्स करतात. असे लोक मस्त लाइफ जगण्यात विश्वास ठेवतात. पण याचा अर्थ अजिबात असा नाही की, इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढतो म्हणून दारू प्यायला सुरूवात करावी. दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यापासून दूर राहिलेलं बरं.