Aliens : गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिक एलिअन्सच्या शोधात आहेत. तुम्ही अनेकदा काही सिनेमांमध्ये एलिअन्स पाहिले असतील. जर रिअल लाइफबाबत सांगयचं तर नेहमीच अनेक व्हिडीओ समोर येत असतात, ज्यात एलिअन्स दिसल्याचा दावा केला जातो. पण हे व्हिडीओ एडिटेड आणि खोटे असल्याचं सांगितलं जातं. लॉकडाऊनमध्ये अमेरिकेन देशांमध्ये एलिअन्स बघितल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. आता वैज्ञानिकांनी सांगितलं की, त्यांना कदाचित त्या जागेचा पत्ता लागला आहे जिथे एलिअन्स राहतात.
वैज्ञानिकांनी दावा केला की, एलिअन्स खास टर्मिनेटर झोन्समध्ये राहतात, जिथे नेहमीच अंधार राहतो. आपल्या सोलर सिस्टीममध्ये असे अनेक एक्सोप्लॅनेट्स आहेत, जे इतर ग्रहांपासून दूर राहतात. यांच्या एका बाजूला सूर्याची किरणं पडतात, पण दुसऱ्या भागावर नेहमीच अंधार असतो. या अंधाऱ्या बाजूला एलिअन्स राहतात, असा दावा केला जात आहे. एस्ट्रोनॉमर्सनी सांगितलं की, या ग्रहांच्या आजूबाजूला एक बॅंड आहे जिथे पाणीही आहे.
हे आहे टर्मिनेटर झोन
ज्या ग्रहांवर एलिअन्स राहतात त्यांना वैज्ञानिकांनी टर्मिनेटर नाव दिलं आहे. या ग्रहांवर दिवस आणि रात्र यात फार अंतर असतं. डार्क साइडला पाणी असेल तर ते नेहमी गोठलेलं राहणार. कारण तिथे तापमान कमी असतं. तेच जिथे सूर्य प्रकाश पडतो, तिथे पाणी वाफ होऊ उडून जाणार. अशात टर्मिनेटर झोन एलिअन्ससाठी योग्य जागा आहे. इथे ना जास्त उष्णता आहे ना जास्त थंडी. म्हणजे इथे पाणी लिक्विड स्वरूपात असेल. अशात ही जागा एलिअन्ससाठी बेस्ट आहे.
असे असतात एक्सोप्लॅनेट्स
यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील डॉक्टर ऐना लोबो यांनी सांगितलं की, एक्सोप्लॅनेट्समध्ये जिथे सूर्य प्रकाश पडतो. तिथे फार जास्त गरमी असते. जिथे अंधार असतो तिथे जास्त थंडी असते. इथे केवळ बर्फ बघायला मिळेल. पण एलिअन्सना राहण्यासाठी अशी जागा हवी जिथे पाणी लिक्विड स्वरूपात असेल. अशात जेव्हा या टर्मिनेटर झोन्सची माहिती मिळाली तेव्हा आम्हाला विश्वास बसला की, एलिअन्स याच ठिकाणांवर लपून राहतात. काही दिवसांआधीच या ठिकाणांवर हालचाल दिसून आली. ही हालचाल एलिअन्सची मानली जात आहे.