आकाशगंगा इतकी विशाल आणि रहस्यमय आहे की, मनुष्यांना याच्या केवळ एका छोट्या भागाबाबतच जाणून घेता आलं आहे. आपली पृथ्वी आणि आजूबाजूच्या ग्रहांशिवाय आपल्याला अशा अनेक एक्सोप्लॅनेट्सबाबत माहितही नाही जिथे आपल्या पृथ्वीप्रमाणेच जीवन असलण्याची शक्यता आहे. European Southern Observatory च्या वैज्ञानिकांनी एक असाच ग्रह शोधला आहे जिथे जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत.
वैज्ञानिकांनुसार, हा ग्रह पृथ्वीपासून जास्त दूरही नाही आणि होऊ शकतं की, एक दिवस मनुष्य इथे पोहोचू शकतील. या ग्रहाला Proxima d चं नाव देण्यात आलं आहे. हा ग्रह सूर्याच्या जवळ आढळून आला. ही बातमी तुम्हाला नक्कीच उत्साहीत करणारी वाटत असेल, पण अडचण ही आहे की, अजूनही मनुष्याकडे तिथे पोहोचण्याचा मार्ग नाहीये कारण हा ग्रह पृथ्वीपासून ४ प्रकाशवर्ष दूर अंतरावर आहे.
European Southern Observatory च्या प्रेस रिलीजमध्ये वैज्ञानिक João Faria ने सांगितलं की, या नव्या शोधातून समजलं की, ब्रम्हांडात आपल्या शेजारी नवी आणि रहस्यमय दुनिया आहे. भविष्यात आणखी शोध करून त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. हा ग्रह आकाराने पृथ्वीच्या एक चतुर्थांश आहे. पृथ्वीप्रमाणेच आपल्या ताऱ्यांना एक फेरी मारण्यासाठी ५ दिवस लागतात. त्याचं स्वत:चं सोलर सिस्टीम आहे आणि जीवनाची स्थिती आहे. हे ESPRESSO कडून कन्फर्म करण्यात आलं आहे. वैज्ञानिकांमध्ये हा ग्रह शोधल्यावर आनंदाचं वातावरण आहे.
हा ग्रह पृथ्वीपासून केवळ ४ प्रकाशवर्ष अंतरावर आहे, पण मनुष्याला तिथे पोहोचण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. आपल्याकडे अजून अशी टेक्नीक बनली नाही की, मनुष्य प्रकाश वर्ष अंतरावर प्रवास करू शकेल कमीत कमी पुढे ८०० वर्ष अशाप्रकारचं तंत्रज्ञान येण्याची शक्यताही नाहीये. प्रकाशवर्ष असं अंतर असतं ज्यात एका ताऱ्यापासून दुसऱ्या ताऱ्यापर्यंत पोहोचण्याचा कालावधी मोजला जातो. एका सेकंदात प्रकाशाची गति ३ लाख किलोमीटर असते. अशात विचार करा की, ४ प्रकाशवर्षाचं अंतर किती जास्त असू शकतं.