अमेरिकेच्या वैज्ञानिकांना एक मौलवान खजिना सापडला आहे. त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया (Southern California) मध्ये एका विशाल तलावाच्या तळाशी 540 बिलियन डॉलर किंमतीच्या पांढऱ्या सोन्याची खाण शोधली आहे. जी बघून त्यांचेही डोळे चमकले. लिथिअम पांढऱ्या रेतीसारखं दिसत असल्याने त्याला पांढरं सोनं म्हटलं जातं.
indy100 च्या रिपोर्टनुसार, साल्टन सी (Salton Sea), जो अमेरिकन राज्यातील सगळ्यात मोठा तलाव आहे. ज्यावर डिपार्टमेंट ऑफ एनर्जी द्वारे फंडेड रिसर्च केला जात होता. या स्टडीचा हा उद्देश होता की, तलावाच्या तळाशी किती लिथिअम आहे. असं मानलं जात आहे की, तलावाच्या तळाशी 18 मिलिअन टन लिथिअम जमा असू शकतं.
हा स्टडी तेव्हा सुरू करण्यात आला जेव्हा वैज्ञानिकांनी सांगितलं होतं की, या तलावात चार मिलिअन टनपेक्षा अधिक लिथिअम होतं. जे एका ड्रिलिंग प्रोसेसच्या माध्यमातून शोधण्यात आलं होतं. मात्र, तलावाच्या तळाशी असलेलं लिथिअम आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त निघालं.
तलावात इतकं लिथिअम सापडलं की, याचा अमेरिकेला फार मोठा फायदा होणार आहे. यातून 382 मिलियन इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवणं शक्य होईल आणि अमेरिका चीनला मागे टाकत केमिकल क्षेत्रातही वर येईल.
कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीमध्ये भू-रसायन विज्ञान (Geochemistry) चे प्रोफेसर माइकल मॅककिबेन यांनी सांगितलं की, हे जगातील सगळ्यात मोठ्या लिथिअम भांडारांपैकी एक आहे. याने अमेरिकला लिथिअमबाबत पूर्णपणे आत्मनिर्भर बनेल. चीनकडून याची आयात बंद होईल. तेच कॅलिफ़ोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसोम (Gavin Newsom) यांनी आधी साल्टन तलावाला लिथिअमचा सौदी अरब म्हटलं होतं. आता नव्या शोधाने समोर आलं की, हा तलावा लिथिअमचा जगातील सगळ्यात मोठा भांडार आहे.