मेडिकल विश्वात दररोज नवनवे शोध लावले जातात. जे फारच आश्चर्यकारक असतात. अनेक वेगवेगळ्या गोष्टींपासून औषधे तयार केली जातात हे तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्ही हे वाचून हैराण व्हाल की, वैज्ञानिकांनी डेड बॉडीपासूनही औषध तयार केलं आहे. या औषधाने तुमचा चेहरा तरूण आणि चमकदार दिसेल. या औषधाचा वापर करून तुम्ही 70 वयातही तुम्ही 27 वर्षांचे दिसाल. अनेक देशांमध्ये याचा वापर होत आहे. एका महिलेने हे औषध घेतल्यानंतर झालेल्या बदलांबाबत खुलासा केला आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 67 वर्षीय डायने स्टासी मार्च महिन्यात तिच्या स्कीन स्पेशालिस्टना भेटली होती. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत होत्या. स्टासी यांना विश्वास होता की, काहीतरी उपाय नक्कीच असेल ज्याने त्या आधीसारख्या दिसतील.
डॉक्टरांनी त्यांना एका रेनुवा नावाच्या प्रोडक्टचा वापर करण्याचा सल्ला दिला. स्टासी यांनी सांगितलं की, मी आधी रेग्युलर फिलरचा वापर करत होते. आधी डॉक्टर म्हणाले की, 4 ते 6 महिन्यात स्कीन चांगली होईल. नंतर वर्षभर उपचार सुरू होते, पण काहीच फायदा झाला नाही. यासाठी 3 हजार डॉलर खर्च होत होते. शेवटी मी जेव्हा नवीन प्रोडक्ट वापरलं तर जणू चमत्कारच झाला.
स्टासी यांनी सांगितलं की, काही महिन्यात त्यांना फरक दिसला. बरेच लोक चेहऱ्यावरील डिंपल किंवा खड्डे भरण्यासाठी सिंथेटिक फिलरचा वापर करतात. ज्यात तुमच्याच शरीरातून फॅट काढून इंजेक्ट केलं जातं. पण आता नवीन ट्रेंडही सुरू झाला आहे. तुम्ही वाचून हैराण व्हाल की, हे नवीन औषध मनुष्याच्या डेड बॉडीपासून तयार केलं आहे. मृत शरीरातून टिश्यू काढून खड्डे असलेल्या भागावर त्याचा वापर केला जातो. लोकांना याने काही साइड इफेक्ट नाही. स्टासी म्हणाल्या की, मी याकडे एका स्कीन ट्रांसप्लांटसारखं बघते. याने जास्त काळ आपली स्कीन तरूण आणि चमकदार दिसते.
46 वर्षीय सामंथा ग्रीन यांच्या पायावरही एक जखम होती. असं वाटत होतं की, एखाद्या शार्कने चावा घेतला असेल. त्यांनी सांगितलं की, माझ्या सर्जनने सांगितलं होतं की, ही जखम भरेल. पण मी शार्ट्स घालू शकत नव्हते. जे फारच वाईट वाटत होतं. तेव्हा स्कीन स्पेशालिस्टने रेणुवाचा वापर करण्याचा सल्ला दिला. दोनदा ट्रीटमेंट केली आणि यावर एकूण ,000 डॉलर खर्च केला. पण मला विश्वास बसला नाही की, एक महिन्याच्या आत स्कीन आधीसारखी झाली. आता मी जखम बघते तर मला भीती वाटत नाही. रेणुवा इतर कोणत्याही फिलरसारखं एक ऑफ-द-शेल्फ इंजेक्शन आहे. ज्याने सर्जरीची गरज पडत नाही.