विज्ञान आणि तंत्राच्या माध्यमातून एक मोठं यश वैज्ञानिकांना आलं आहे. गेल्या काही वर्षात विज्ञान आणि तंज्ञानाने मिळून अशी काही कामे केली आहेत, जी विचाराच्या पलिकडची आहेत. असाच एक मोठा कारनामा वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनी १ हजार वर्षांपूर्वी मृत झालेल्या महिलेच्या अवशेषांवरून तिचा 'खरा चेहरा' तयार केला आहे. ब्रिटीश वैज्ञानिकांनी वायकिंग महिलेच्या अवशेषांपासून तिचा चेहरा तयार केला आहे. वैज्ञानिकांना महिलेचे हे अवशेष नॉर्वेच्या सोलोरमधील वायकिंग स्मशानभूमीत सापडले होते.
रिपोर्ट्सनुसार, अनेक वर्षांआधी वायकिंग होते. त्यांचं साम्राज्य प्रामुख्याने लूटमारीच्या मदतीने चालत आणि वाढत असे. वायकिंग समुदायाचा संबंध नॉर्वे आणि आजूबाजूच्या परीसराशी होता. पण लूटमार करण्यासाठी ते अनेक दिवस आपल्या घरांपासून दूर राहत होते. वायकिंग समुदायात महिला आणि पुरूष दोघेही लुटमार करायचे. असं मानले जात आहे की, महिला १ हजार वर्षांआधी तशाच दिसत असतील, जसा वैज्ञानिकांनी या महिलेचा चेहरा तयार केलाय.
या वायकिंग महिलेचे अवशेष ओल्सोच्या म्युझिअम ऑफ कल्चरल हिल्ट्रीमध्ये संग्रहित करून ठेवले जातील. वैज्ञानिकांनी वायकिंग महिलेच्या कबरेतून सांगाडा तसेच तीर, तलवार, कुऱ्हाड आणि भालेही काढले. यांचा वापर ते लुटमार करण्यासाठी करायचे.
वैज्ञानिकांना महिलेच्या कवटीवर एका मोठ्या जखमेचा निशानही दिसला. हा घाव तिच्या कपाळावर होता. संशोधक एला अल-शामहीने सांगितले की, कबरेत मिळालेल्या अवशेषांना सुरूवातीपासूनच महिलेचे मानण्यात आले होते. पण ही कबर कुण्या योद्ध्याची मानली जात नव्हती. कारण ही एका महिलेची कबर होती.
अल-शामहीनुसार, हे स्पष्ट नाही की, कपाळावरील खोलवर जखेमेमुळेच महिलेचा मृत्यू झाला होता की नाही. एखाद्या वायकिंग महिलेचा युद्धात जखमी झाल्याचा हा पहिला पुरावा आहे. अल-शामहीने सांगितले की, ते याबाबत फार उत्साही आहेत. कारण हा एक असा चेहरा आहे, जो १ हजार वर्षांआधी कुणीही पाहिला नाही आणि आता अचानक सर्वांसमोर आला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचा चेहरा वैज्ञानिकांनी फेशिअल रिकग्नीशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केला आहे. चेहरा शरीरातील कृत्रिम मांसपेशी आणि त्वचेपासूनच तयार करण्यात आला आहे. चेहरा तयार करण्याच्या प्रक्रियेला एका माहितीपटाद्वारे नॅशनल जिओग्राफीवर तीन डिसेंबरला प्रसारित केलं जाईल.