आकाशातील वेगवेगळ्या ग्रहांमध्ये सतत काहीना काही बदल होत असतात. वैज्ञानिक अनेक वर्ष या ग्रहांचा अभ्यास करत आहे. या ग्रहांवर जीवन आहे का? याचा शोध घेत असतात. अनेकदा असे दावेही करण्यात आलेत. अशात आता वैज्ञानिकांना शुक्र ग्रहावर फॉस्फिन नावाच्या गॅसचा एक मोठा ढग आढळून आलाय. त्यामुळे तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिथे नक्की जीव आहे की नाही याचा शोध लागलेला नाही. मात्र पृथ्वीच्या अंतरंगात असणाऱ्या बॅक्टेरियांमुळे हा गॅस तयार झाला आहे. जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांच्या हवाई येथील दुर्बिणीतून हा गॅसचा ढग दिसलाय.
कार्डिफ यूनिव्हर्सिटीतील वैज्ञानिक जेन ग्रीव्स यांनी सांगितले की, 'माझ्यासाठी हे मोठं सरप्राईज आहे आणि मला खूप धक्का बसला आहे. पृथ्वी व्यतिरिक्त आणखी कुठे मानवी जीवन आहे की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. मागील अनेक दशके यावर रिसर्च सुरु असून अजूनपर्यंत याचा शोध लागलेला नाही'.
मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील खगोलशास्त्रज्ञ क्लारा सोसा-सिल्वा यांनी सांगितले की, 'आम्हाला सध्या इतकं समजलंय की, शुक्र ग्रहावर जे आहे ते केवळ फॉस्फिन गॅस आहे. मात्र त्यावर जीवन असू शकते ही खूप मजेशीर कल्पना आहे. जर त्यावर जीवन अस्तित्वात असेल किंवा तेथे मानवासाठी पोषक वातावरण आहे तर ही खूप मोठी बाब आहे. त्याचबरोबर आपल्या आकाशगंगेत अजून यासारखे अनेक जीव आणि ग्रह असण्याची देखील शक्यता आहे'.
त्या पुढे म्हणाल्या की, 'शुक्र हा ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. हा ग्रह दिसायला पृथ्वीसारखाच आहे. मात्र आकार लहान आहे. शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर खरच तेथे जीवन असेल तर ते कसे असेल याची मला देखील उत्सुकता असेल. काही वर्षांपूर्वी या ग्रहावर जीवन अस्तित्वात होते, असे पुरावे होते. मात्र काही बदलांमुळे या ठिकाणी झालेल्या बदलांमुळे जीवन नष्ट झाले'.
जगापासून लपवून कोरोना फ्री शहर बनवत आहे चीन, अखेर सीक्रेट फोटो आले समोर
बाबो! २ वर्षात ९ वेळा आई झाली ही महिला, आता पतीसोबत रोमान्स करायलाही मिळत नाही वेळ!