शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

शास्त्रज्ञांनी उलगडले 4500 वर्षे जुन्या 'स्फिंक्स'चे गूढ, अशा प्रकारे बांधली गेली महाकाय मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 8:23 PM

इजिप्तच्या 4500 वर्षे जुन्या स्फिंक्स मूर्तीबाबत अनेक दावे केले जातात.

प्राचीन इजिप्तची अनेक रहस्ये आजही जगासाठी रहस्य बनून राहिली आहेत. यात गिझाच्या ग्रेट पिरॅमिडचाही समावेश आहे. हा पिरॅमिड कसा बांधला गेला, अवाढव्य दगड यंत्राशिवाय एकावर-एक कसे ठेवले गेले, या सर्व गोष्टी आजपर्यंत एक गूढच राहिल्या होत्या. याशिवाय, 4,500 वर्षे जुन्या 'स्फिंक्स मूर्ती'चे गूढही आतापर्यंत शास्त्रज्ञांना उकलण्यात यश आले नव्हते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी या अनोख्या बांधकामाचे गूढ सोडवले आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हे गूढ सोडवल्याचा दावा केला आहे. 

इजिप्तमधील महाकाय आकाराची 'स्फिंक्स'(अर्धा माणूस-अर्धा सिंह) मूर्ती गवंड्यांनी हाताने तयार केली असावी, असे मानले जायचे. पण, या मूर्तीचे शरीर कसे बांधले, याचे रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आले नव्हते. आता न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आता एक संशोधन अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये या मूर्तीबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. मूर्तीच्या अनोख्या आकाराबाबत या अभ्यासातून मोठी माहिती समोर आली आहे. हे संशोधन फिजिकल रिव्ह्यू फ्लुइड्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. 

शास्त्रज्ञांचा प्रयोग यशस्वी झालामीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांनी मूर्तीतील कठोर आणि मऊ मातीवर प्रयोग केला. वाऱ्याचा मूर्तीवर काय परिणा होतो, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ही माती वेगाने वाहणाऱ्या पाण्याने धुतली. यामुळे शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, स्फिंक्सची निर्मिती अशाच पद्धतीने झाली असावी. वाऱ्याचा परिणाम होऊन या मूर्तीने असा आकार घेतल्याचा अंदाज शास्त्रज्ञांचा आहे. स्फिंक्सचा पुतळा कसा बांधला गेला, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1981 मध्ये भूवैज्ञानिक फारूक एल-बाज यांनी असाच एक सिद्धांत मांडला होता. त्यांनी दावा केला होता की, ग्रेट स्फिंक्सचे शरीर वाऱ्यामुळे नैसर्गिकरित्या तयार झाले आहे.

कसा आहे ग्रेट स्फिंक्स पुतळाग्रेट स्फिंक्स पुतळा 73 मीटर लांब, 20 मीटर उंच आणि 19 मीटर रुंद आहे. त्याचे नाक तुटलेले आहे, जे कोणीतरी जाणूनबुजून केले असावे असा समज आहे. बारकाईने तपासले असता नाक फोडण्यासाठी छन्नीचा वापर केल्याचे दिसून येते. ग्रेट स्फिंक्सच्या हरवलेल्या नाकाचा सर्वात जुना उल्लेख 15 व्या शतकातील इतिहासकार अल-माक्रीझीच्या लेखनात आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सscienceविज्ञान