अनेकांनी जेव्हा पहिल्यांदा पॉप स्टार मायकल जॅक्सन (Micheal Jackson) याला डान्स करताना पाहिलं असेल तेव्हा हेच वाचलं असेल की, त्याच्या डान्सनमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला असेल. कारण असं कसं कुणी ४५ डिग्री अॅंगलपर्यंत वाकू शकतं. पण मायकल जॅक्सन हे एकदा नाही तर अनेकदा करत होता. मात्र, यामागचं गुपित क्वचितच लोकांना माहीत आहे. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मायकल जॅक्सनला त्याच्या गाण्यामुळे किंग ऑफ पॉप म्हटलं जातं. आणि डान्यच्या माध्यमातून तो जगभरातील लोकांच्या मनात घर करून आहे. मायकल जॅक्सनने दिलेला मून वॉक आणि 'Anti-Gravity' डान्स स्टेप आज जगभरातील डान्सर करतात. तुम्हीही कधीना कधी मागे सरकत मून वॉक करण्याचा प्रयत्न केला असेल. पण Anti-Gravity स्टेप करण्याची हिंमत झाली नसेल.
Anti Gravity चं गुपित
१९८७ मध्ये रिलीज झालेल्या 'स्मूथ क्रिमिनल'मध्ये मायकल जॅक्सन पहिल्यांदा ४५ डिग्रीपर्यंत वाकताना दिसला होता. एका सामान्य माणूस पुढच्या बाजूला २० डिग्रीपर्यंत वाकू शकतो. ज्यांच्या पायांच्या मांसपेशी जास्त मजबूत असतात, ते जास्तीत जास्त ३० डिग्रीपर्यंत वाकू शकतात. ४५ डिग्रीपर्यंत वाकणं मनुष्यासाठी शक्य नाही.
याचं गुपित लपलं होतं मायकल जॅक्सनच्या शूजमध्ये. त्याच्या शूजची बनावट खास असायची. जेव्हा तुम्ही या डान्स स्टेपची कॉपी कराल तर तुम्हाला जाणवेल की, यावेळी पूर्ण जोर पायाच्या मागच्या बाजूच्या मांसपेशीवर पडत आहे. पाठीच्या कण्यावर कोणताच दबाव नाही.
मायकल जॅक्सनच्या शूजमध्ये एक V आकाराचा तुकडा लावलेला असायचा. हा V आकाराचा तुकडा जमिनीवर लावलेल्या खिळ्यात अडकायचा. याने त्याला पुढच्या बाजूस वाकण्याला मदत होत होती. सुरक्षेसाठी कंबरेला दोरही बांधलेला असायचा. मायकल जॅक्सनचे शूज हे Astronauts च्या शूजवरून प्रेरित होते. जे शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी त्यांना पृष्ठभागावर टिकून राहण्यासाठी मदत करत होते.