शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जवळपास 2 वर्षे लांब चालते हत्तीणीची प्रेग्नन्सी, जाणून घ्या यामागचं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 4:20 PM

Elephant Pregnancy : हत्तीणीच्या गर्भात तिचं पिल्लू हे जवळपास 2 वर्षे राहतं. हा एखाद्या प्राण्याचा बाळाचा आपल्या आईच्या पोटात राहण्याचा सर्वात मोठा कालावधी आहे.

Elephant Pregnancy : हत्तींबाबत वेगवेगळी माहिती सोशल मीडियावर नेहमीच शेअर होत असते. अशीच एक आश्चर्यकारक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हत्तीवर अभ्यास करणाऱ्यांनी एका रहस्यावरून पडदा उठवला आहे. वैज्ञानिकांनी हत्तीच्या लांब कालावधीच्या प्रेग्नन्सीचं रहस्य काही वर्षांपूर्वी उलगडलं होतं.

हत्तीणीच्या गर्भात तिचं पिल्लू हे जवळपास 2 वर्षे राहतं. हा एखाद्या प्राण्याचा बाळाचा आपल्या आईच्या पोटात राहण्याचा सर्वात मोठा कालावधी आहे. प्रिसीडिंग्स ऑफ द रॉयल सोसायटी बी मध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये वैज्ञानिकांना हत्तीणीच्या गर्भाबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे.वैज्ञानिकांना आशा आहे की, याने प्राणी संग्रहालयातील हत्तीणींच्या प्रजननासाठी फार मदत होईल. तसेच आफ्रिकेत हत्तींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भनिरोधक उपायही केले जाऊ शकतील.

हत्ती हा फार बुद्धीमान प्राणी आहे. त्यांच्यात 68 दिवसांचा गर्भधारणेचा कालावधी असतो. आतापर्यंत हत्तीणीच्या इतक्या लांब गर्भावस्थेबाबत फारशी माहिती नव्हती. विकसित अल्ट्रासाउंड टेक्नॉलॉजीने व्हेटर्नरी वैज्ञानिकांना असे काही उपकरणे मिळाले आहेत ज्याने त्यांना हत्तीणीच्या गर्भावस्थेबाबत अधिक जाणून घेता आलं. 

हा रिसर्च ब्रिटन, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्या प्राणी संग्रहालयातील आफ्रिकेतील आणि आशियातील  17 हत्तीणींवर करण्यात आला. या रिसर्चमधून समोर आलं आहे की, हत्तींच्या अंडोत्सर्गाचं एक खास चक्र असतं. डॉ. ल्यूडर्स यांनी सांगितले की, हत्तीणीमध्ये जास्त काळ गर्भावस्था चालते याचं कारण हार्मोनची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कोणत्याही जनावराच्या प्रजातीत होत नाही. या रिसर्चने जंगलात आणि प्राणी संग्रहालयात राहणाऱ्या हत्तींना फायदा होईल.

वैज्ञानिकांनी सांगितले की, विषय केवळ इतकाच नाहीय की, हत्तीणींमध्ये 22 महिन्याचा गर्भावस्थेचा काळ फार जास्त असतो. त्याशिवाय दोन पिल्लांच्या जन्माचं अंतर देखील अधिक असतं. हे अंतर चार ते पाच वर्षाचं असतं. याने हत्तीच्या पिढीत फार अंतर येतं. 

हत्तींच्या काही प्रजाती जंगलाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांसाठी घातक असतात. कारण हे हत्ती घोळक्याने येतात आणि गाव उध्वस्त करून जातात. भारतात असं छत्तीसगढ आणि बंगालसारख्या काही भागांमध्ये होतं. तेच हत्तींच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. पण काही भागांमध्ये हत्तींच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणाची मागणीही होत आहे. अशात हा रिसर्च या भागांमध्ये उपयोगी ठरू शकतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके