घर घ्यायचं म्हटलं की आधी पैशांचा, मग लोन घेण्याचा विचार आणि टेन्शन येतं. प्लॉट घ्यायचा म्हटलं तरी टेन्शन येतं. पण आता या दोन्ही गोष्टींचं तुमचं टेन्शन दूर होणार आहे. कारण आता मुव्हेबल घरांचा ट्रेन्ड येऊ लागला आहे. अमेरिकेमध्ये अशी घरे आली सुद्धा आहे. हे घर तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि कुठेही राहू शकता.
हे घर १०६ स्क्वेअर फूटाचं असून नॉर्थ अमेरिकेत या घरांचा ट्रेन्ड वाढतो आहे. इथे अशाप्रकारची घरे घेऊन लोक डोंगरांमध्ये राहत आहेत. कारण त्यांना हव्या त्या ठिकाणी रहायला मिळत आहे.
हे लाकूड आणि फायबरपासून तयार करण्यात आलेलं एक कॅबिन आहे. कधी ते याला त्यांचं ऑफिस बनवतात तर कधी घर बनवतात. या घराची किंमत १९ हजार यूरो म्हणजे भारतीय करन्सीच्या हिशोबाने १६ लाख रुपये आहे.
एकीकडे काही लोक आपल्या गरजांची लिस्ट वाढवत आहे तर दुसरीकडे काही लोक हे आपल्या गरजा कमी करु लागले आहेत. हे घर त्यांच्यासाठीच फायद्याचं आहे. काही वर्षांनी ही घरे भारतातही आली तर नवल वाटायला नको.